Nashik News : भाजीपाला बाजारात आवक वाढल्याने मेथी, कोथिंबीर कवडीमोल

Vegetable Market News
Vegetable Market Newsesakal

मालेगाव : शहरासह कसमादे परिसरात महिन्यापासून भाजीपाल्याची आवक वाढली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. मेथी व कोथिंबीरचे भाव मात्र खूपच घसरले आहेत. मेथी व कोथिंबीरची जुडी पाच ते सात रुपयांना मिळत आहे.

या पिकातून शेतकऱ्यांचा खर्चदेखील निघत नाही. येथील बाजारात वांगे, शेवगा, गवार या भाजीपाल्यांना चांगला भाव मिळत आहे. भाजीपाल्याचे घाऊक दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. (Fenugreek Coriander rate decrease value in vegetable market Nashik News)

Vegetable Market News
Nashik News : काळाराम मंदिरात काळाकुट्ट अंधार; व्यवस्थापनाचे दुर्लक्ष

कसमादे भागातील बहुसंख्य शेतकरी कौटुंबिक व शेतीचा किरकोळ खर्च भागविण्यासाठी भाजीपाल्याची लागवड करतात. महिन्यापासून येथील बाजारात भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव काही प्रमाणात कमी झाले आहेत.

येथील घाऊक बाजारात कारले, पालक, शेवगा, हिरवा वटाणा, भेंडी, मेथी, कोबी, फ्लॉवर, गाजर, टोमॅटो, वांगे, मुळे, मिरची, डांगर, गिलके, दोडके, गवार, कांदापात, अद्रक, बटाटे यांसह अनेक भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. येथे भाजीपाला स्वस्त झाल्याने ते विक्री करणाऱ्या हातगाड्याही वाढल्या आहेत.

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

Vegetable Market News
Nashik News : यशू जन्‍माचा भाविकांकडून जल्‍लोष

महिन्यापासून येथील बाजारात तालुका व परिसरातून भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. येथे वांगे, गवार, शेवगा या भाज्यांना चांगला भाव मिळत आहे. टोमॅटोपाठोपाठ बाजारात मेथी, कोबी, कोथिंबीरच्या भावातही मोठी घसरण झाली आहे. भाजीपाल्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना भाजीपाला परवडेनासा झाला आहे. काही शेतकरी शहरातील सटाणा नाका, सोमवार बाजार, एकबाल डाबी, मच्छी बाजार, सरदार चौक आदी बाजारात भाजीपाला आणून स्वत: विक्री करीत आहेत. येथे तीन महिन्यांपूर्वी फ्लॉवर, कोथिंबीर, टोमॅटो, गिलके, भेंडी आदींचे भाव वाढले होते. सध्या आवक वाढल्याने त्यांचे दर काही प्रमाणात घसरले आहेत.

Vegetable Market News
Nashik News : मालेगावात ॲप्पल बोरची धूम! रोज पंधराशे कॅरेटची आवक

भाजीपाल्याचे घाऊक दर (किलोमध्ये)

भाजीचे नाव- रुपये

कारले- २० ते २५

पालक- ४ ते ५ रुपये जुडी

शेवगा- ६० ते ७०

हिरवा वटाणा- २५ ते ३० रुपये

भेंडी- ३५ ते ४०

मेथी- ५ ते ७ रुपये जुडी

कोथिंबीर- ५ रुपये जुडी

कोबी- ५० रुपये बॅग

फ्लॉवर- १२ ते १५

गाजर- २०

टमाटे- १०० ते १२० रुपये कॅरेट

वांगे- २५० रुपये कॅरेट

मुळा - ७० रुपये गठ्ठा

मिरची- २५

डांगर- २२

गिलके- ४०

दोडके- ४० ते ४५

गवार- ८० ते ९०

कांदापात- ६ रुपये जुडी

अद्रक- ४० ते ४५

बटाटे - २० रुपये

Vegetable Market News
Nashik News : NMCत करसल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com