esakal | #COVID19 : नाशिक जिल्ह्यात १५ संशयित दाखल..अहवाल अद्याप प्रलंबित 

बोलून बातमी शोधा

corona 2.jpg

जिल्ह्यात कोरोनाग्रस्त देशातून दौरा करून आलेले 12 जण आढळले आहेत. त्यामध्ये सौदीमधील एका आणि इतर देशांतील 11 जणांचा समावेश आहे. मात्र युनायटेड अरब अमिरात, इटली, इराण, जर्मनी, चीन, अमेरिका, इंग्लंडमधून आलेला एकही प्रवासी आढळलेला नाही

#COVID19 : नाशिक जिल्ह्यात १५ संशयित दाखल..अहवाल अद्याप प्रलंबित 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : लासलगावशेजारील पिंपळगावनजीक येथील तरुणाच्या स्वॅब तपासणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सोमवारी (ता. 30) नव्याने दाखल झालेल्या 15 संशयितांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. कोरोनाग्रस्त देशांतून जिल्ह्यात 709 जण आले असून, 192 जणांचे 14 दिवसांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तसेच 517 जणांचे दैनंदिन सर्वेक्षण करण्यात आले आहे.

सोमवारी दाखल झालेल्यांची संख्या अशी

 जिल्हा रुग्णालय- 2, मालेगावचे सामान्य रुग्णालय- 6, नाशिक महापालिकेचे डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय- 7. दरम्यान, सोमवारपर्यंत 88 नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. त्यांपैकी 72 जणांचा अहवाल "निगेटिव्ह' आला आहे. 

हेही वाचा > #Lockdown : 'ताई, खूप दिवसांनी घरचं जेवण मिळालं!'...अन् 'त्या' पोलिसांचे डोळे पाणावले​

जिल्ह्यात 12 जण आढळले 
जिल्ह्यात कोरोनाग्रस्त देशातून दौरा करून आलेले 12 जण आढळले आहेत. त्यामध्ये सौदीमधील एका आणि इतर देशांतील 11 जणांचा समावेश आहे. मात्र युनायटेड अरब अमिरात, इटली, इराण, जर्मनी, चीन, अमेरिका, इंग्लंडमधून आलेला एकही प्रवासी आढळलेला नाही

#Lockdown : ...अन् अडकलेल्या 'त्या' गर्भवतीच्या मदतीला 'ते' देवदूतासारखे धावून आले!