esakal | टीव्ही अँकर अमिष देवगणविरुद्ध मालेगावात गुन्हा दाखल 
sakal

बोलून बातमी शोधा

amish devgan.png

अँकर अमिष देवगण यांच्याविरुद्ध येथील शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अमिष देवगण यांनी अपशब्द वापरल्याने शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

टीव्ही अँकर अमिष देवगणविरुद्ध मालेगावात गुन्हा दाखल 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : न्यूज चॅनलला अँकरिंग करताना अजमेर शरीफ ख्वाजा मोईनोद्दीन चिस्ती यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल अँकर अमिष देवगण यांच्याविरुद्ध येथील शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अमिष देवगण यांनी अपशब्द वापरल्याने शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

लोकशाही मार्गाने निवेदन

अमिश देवगण यांनी १५ जून रोजी आपल्या टीव्ही शोमध्ये मोइनुद्दीन चिश्ती यांच्याबद्दल अनुद्गार काढले होते. त्यावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. कॉंग्रेस प्रवक्ता साबीर गौहर यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने, शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना कोणीही यासंबंधात आंदोलन करू नये. लोकशाही मार्गाने निवेदन देण्यास हरकत नाही, असे पोलिस प्रशासनाने कळविले आहे. नागरिकांनी शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही केले आहे. 

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट 

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण

loading image