esakal | कोरोनाविरुद्ध लढाईत सहभागी होणार ५ हजार योध्दे! रुणालयांतून बजावणार कर्तव्‍य

बोलून बातमी शोधा

Medical Student

कोरोनाविरुद्ध लढाईत सहभागी होणार ५ हजार योध्दे! रुणालयांतून बजावणार कर्तव्‍य

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : कोरोना महामारीच्‍या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्‍य यंत्रणेवर ताण आला असून, डॉक्‍टर अहोरात्र रुग्‍णसेवेत व्‍यस्‍त आहेत. या लढ्यात आणखी चार हजार ९२३ योद्धे सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठातर्फे एमबीबीएसच्‍या अंतिम वर्षाचा निकाल सोमवारी (ता. २६) रात्री जाहीर झाला असून, उत्तीर्ण विद्यार्थी इटर्नशिपद्वारे सेवा बजावतील. यापैकी काही कोरोनाबाधितांवर, तर अन्‍य काही सामान्‍य रुग्‍णांवर उपचारार्थ उपलब्‍ध होतील.

कोरोना महामारीमुळे विविध परीक्षा प्रभावित होत असताना दुसरी लाट येण्यापूर्वीच अंतिम वर्ष एमबीबीएसची लेखी परीक्षा घेण्यात आली. राज्‍यात डॉक्‍टरांचा तुटवडा लक्षात घेता, या विद्यार्थ्यांची प्रात्‍यक्षिक (प्रॅक्टिकल) परीक्षा घेऊन आरोग्‍य सेवेत प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर दाखल करून घेण्याचे धोरण निश्‍चित केले होते. याअनुषंगाने महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठामार्फत ही प्रक्रिया पूर्ण केली आहे.

हेही वाचा: महामारी आजारांचा चारशे वर्षांचा इतिहास! सोशल मीडियावर संदर्भासह चित्र व वृत्त

रविवारीच पूर्ण झाली प्रात्यक्षिक परीक्षा

अंतिम वर्ष एमबीबीएसच्‍या हिवाळी सत्र २०२०च्‍या परीक्षेत राज्‍यभरातून पाच हजार २३४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. गेल्‍या ८ ते २४ मार्चदरम्‍यान त्यांची लेखी परीक्षा झाली. तर प्रात्यक्षिक परीक्षा ३० मार्च ते २५ एप्रिलपर्यंत घेण्यात आली. तत्‍पूर्वी लेखी परीक्षेतील उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया ८ ते २३ एप्रिलदरम्‍यान झाली. या परीक्षेतील प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी पाच हजार १५२ विद्यार्थ्यांचा निकाल घोषित केला आहे. सोमवारी रात्री जाहीर केलेल्‍या निकालात चार हजार ९२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णाची टक्‍केवारी ९४.०६ टक्‍के आहे. उत्तीर्ण झालेल्‍या विद्यार्थ्यांना एक वर्षाचे इटर्नशिप पूर्ण करायचे आहे.

एमबीबीएसच्‍या अंतिम वर्षाचा निकाल जाहीर केला असून, उत्तीर्ण विद्यार्थी इंटर्नशिपच्‍या माध्यमातून राज्‍यभर सेवा बजावतील. कोरोना महामारीच्‍या पार्श्‍वभूमीवर कुलपती, कुलगुरू यांच्‍या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्‍याने सध्याच्‍या अडचणीच्‍या काळात रुग्‍णसेवेसाठी सुमारे पाच हजार डॉक्‍टर उपलब्‍ध होतील.

-डॉ. अजित पाठक, परीक्षा नियंत्रक, महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठ

हेही वाचा: खाकीच्या रुपात धावले देवदूत! चालत्या ट्रेनमध्ये अडकलेल्या वृध्दाला वाचविले; पाहा VIDEO