
नाशिक : ऐतिहासिक साल्हेर किल्ल्यावर आग
साल्हेर (जि. नाशिक) : बागलाणच्या पश्चिम आदिवासी (Tribal) पट्ट्यात ऐतिहासिक साल्हेर किल्ल्यावर (Salher Fort) शुक्रवारी (ता. २९) दुपारी तीनच्या सुमारास आग लागली. ग्रामस्थांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधला.
हेही वाचा: नाशिक : सेंट्रल किचन कारवाई कधी?
वनविभागाचे उपविभागीय अधिकारी एरडावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ताराबाद वन परिक्षेत्र अधिकारी एच. व्ही. सहाने, वन परिक्षेत्र मंडळाधिकारी व्ही. एन. देवरे, वनरक्षक संगीता चौरे, सुनीता बहिरम, गणेश बहिरम, सतीश बहिरम, कैलास बहिरम यांनी आगीवर नियंत्रण आणले. वनौषधी झाडांचे व वनप्राण्यांचे प्राण वाचविण्यासाठी आम्ही यशस्वी झालो. आग नेमकी उष्णतेमुळे लागली की लावली गेली, याचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती ताहाराबादचे वन परीमंडळ अधिकारी विनायक देवरे यांनी दिली.
हेही वाचा: उन्हामुळे नाशिककरांच्या ताणतणावात वाढ; डॉक्टरांचा निष्कर्ष
Web Title: Fire At Historic Salher Fort Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..