Nashik Fire Accident : मालेगाव स्टँडवरील मशिनरी दुकानास आग; 8 लाखांचे नुकसान

Fire at machinery shop at Malegaon stand Nashik Fire Accident news
Fire at machinery shop at Malegaon stand Nashik Fire Accident newsesakal
Updated on

Nashik Fire Accident : मालेगाव स्टँडवरील लघु व गृह उद्योगासाठी लागणारे मशिनरी विक्री करणाऱ्या दुकानास गुरुवार (ता.२७) रोजी रात्री सुमारे ८.३० ते ८.४५ दरम्यान आग लागली.

यात दुकानातील सर्व मशिनरी जळून खाक झाल्या असून जवळपास सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. (Fire at machinery shop at Malegaon stand Nashik Fire Accident news)

याबाबत अधिक माहिती अशी की, मालेगाव स्टँड येथे साईकृपा योगेश केशव तादरे यांचे मशिन हाऊस नावाचे दुकान आहे. या दुकानात गृह व लघु उद्योगांस लागणाऱ्या मशिनरी विक्रीसह दुरूस्ती कामकाज चालते.

यात घरगुती पीठाच्या गिरणीसह त्यांच्या पार्टची देखील विकी केली जाते. हे दुकान बंद असताना गुरुवार (ता.२७) रोजी रात्री साडे ८.३० ते ८.४५ च्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यावेळी एका सुजाण नागरिकांने अग्निशामक दलास दूरध्वनीहून कळविले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Fire at machinery shop at Malegaon stand Nashik Fire Accident news
Nashik Crime: अज्ञात समाज कंटकाचा खोडसाळपणा; कांदाचाळीत युरिया टाकल्याने साडे बावीस लाखांचे नुकसान

हाकेच्या अंतरावर असलेल्या अग्निशामक दल काही मिनिटात घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आग विझविण्यासठी पंचवटी विभाग मालेगाव स्टँड येथील दोन बंब, अमृतधाम येथील एक बंब असे एकूण तीन आले.

या आगीत सर्व मशिनरी जळून खाक झाल्या असून जवळपास साडे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाचे लिडिंग फायरमन एम के सोनवणे, शिवाजी मतवाड, आय ए पानसरे, ट्रेनी फायरमन संकेत वैष्णव, संतोष मेंद्रे, दिनेश लासुरे, संदीप जाधव, श्रीकांत नागपुरे एम एन शेख तसेच वाहनचालक आर आर काठे, व्हि एम शिंदे, यांनी आग आटोक्यात आणली.

Fire at machinery shop at Malegaon stand Nashik Fire Accident news
Nashik Crime: वाहन तोडफोड प्रकरणी दोघांना अटक; एक तडीपारही गजाआड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com