esakal | धक्कादायक! कर्मचाऱ्यांनी ब्लॅंकेट, चादरी टाकल्याने मोठा अनर्थ टळला! काय घडले नेमके? 
sakal

बोलून बातमी शोधा

fire_.jpeg

टाटिया कुटुंबीयांनी प्रसंगावधान दाखवत पाण्याचा मारा केला. मात्र काही परिणाम झाला नाही. यावेळी कर्मचाऱ्यांनी ब्लॅंकेट, चादरी टाकल्या त्यानंतर..

धक्कादायक! कर्मचाऱ्यांनी ब्लॅंकेट, चादरी टाकल्याने मोठा अनर्थ टळला! काय घडले नेमके? 

sakal_logo
By
युनूस शेख

नाशिक : टाटिया कुटुंबीयांनी प्रसंगावधान दाखवत पाण्याचा मारा केला. मात्र काही परिणाम झाला नाही. यावेळी कर्मचाऱ्यांनी ब्लॅंकेट, चादरी टाकल्या त्यानंतर..

असा घडला प्रकार

बोहरपट्टीत राजेंद्रकुमार टाटिया यांच्या घरातील किचनमध्ये रविवारी (ता. २३) रात्री आग लागली. सिलिंडरमधून गॅसगळती झाल्याने रेग्युलेटर आणि नळीने पेट घेतला. टाटिया कुटुंबीयांनी प्रसंगावधान दाखवत पाण्याचा मारा केला. मात्र आग विझली नाही. शिंगाडा तलाव मुख्यालय आणि पंचवटी विभागाचे असे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी ब्लॅंकेट, चादरी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग विझत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी सीओटूचा मारा केला. वीस मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळविले.  

हेही वाचा > पहाटेची वेळ...मंदिरात आश्रयाला थांबलेले गुराखी दुर्गंधीने अस्वस्थ; शोध घेताच बसला धक्का

मोठी दुर्घटना टळली.

सराफ बाजारातील बोहरपट्टी येथील एका वाड्याच्या तिसऱ्या मजल्यावर गॅसगळतीमुळे आग लागली. अग्निशमन दलाच्या बंबांनी त्वरित आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली.

हेही वाचा > भरचौकात 'त्याने' थेट वाहतूक पोलिसाच्याच श्रीमुखात भडकावली...नेमके काय घडले?

loading image
go to top