VIDEO : शॉकसर्किटमुळे क्षणात आगीने घेतला पेट...सुदैवाने जीवितहानी नाही

The fire caused by the shock circuit.jpg
The fire caused by the shock circuit.jpg
Updated on

नाशिक : (सिडको) दुर्गानगर येथील इन्कमटॅक्स कॉलनी सोसायटीच्या जागेतील शेडला शॉकसर्किटने आग लागल्याने अडगळीच्या सामानाचे नुकसान झाले. सुदैवाने या ठिकाणी कुठलीही जीवित हानी झाली नाही.

अशी घडली घटना

सोमवारी (दि.2) दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास मनपा सिडको बांधकाम विभागाच्या कार्यालया शेजारील इन्कमटॅक्स कॉलनीच्या ताब्यातील जागेत असलेल्या शेडला अचानक आग लागली. यावेळी शेडमध्ये व बाहेर असलेले संपूर्ण लाकडाचे साहित्य जळून खाक झाले. दरम्यान या घटनेची माहिती समजताच अग्निशामक पथक घटनास्थळी आले. यावेळी बघ्यांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्याचा आग विझवतांना अग्निशामक कर्मचार्‍यांना त्रास झाला. ही आग विझवण्या साठी अग्निशामक दलाचे दोन बंब वापरावे लागले. गेल्या 20 दिवसांपूर्वी याच शेडला मध्यरात्री आग लागली होती. त्यावेळी देखील अग्निशामक दलाच्या पथकाने येऊन तात्काळ आग विझवली होती. सदर शेडमध्ये अडगळीचे सामान मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आले आहे. याची सोसायटीने तात्काळ विल्हेवाट लावल्यास पुन्हा असा अनुचित प्रकार घडणार नसल्याचे जाणकारांनी व्यक्त केले.

यावेळी अग्निशामक दलाचे शिवाजी मतवाड, अविनाश सोनवणे, मोईनुद्दीन शेख, संजय गाडेकर, काका पवार, एस.डी.घुगे, आय.आय.काजी आदींनी सुमारे दीड तासाच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com