Nashik News : नायलॉन मांजातून पक्ष्यांची सुटका करण्यात अग्निशामक विभागाची सेंच्युरी

नायलॉन मांजात पक्षी अडकल्याच्या अनेक घटना घडत असतात. अशा पक्ष्यांची सुटका करण्यात अग्निशामक विभागाने सेंच्युरी केली आहे.
Fire department
Fire departmentesakal

Nashik News : नायलॉन मांजात पक्षी अडकल्याच्या अनेक घटना घडत असतात. अशा पक्ष्यांची सुटका करण्यात अग्निशामक विभागाने सेंच्युरी केली आहे. १३ महिन्यात शहराच्या विविध भागातून सुमारे ११३ पक्ष्यांची सुटका करत त्यांना जीवदान दिले.

७ पक्ष्यांना मात्र प्राण गमवावा लागला. (Fire department century in rescuing birds from nylon netting nashik news)

पतंगप्रेमींकडून जिवास धोकादायक अशा नायलॉन मांजास पसंती दिली जाते. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर बाजारात बंदी असताना चोरीछुपे पद्धतीने नायलॉन मांजा विक्री होत असतो. त्यामुळे दुर्घटनांमध्ये वाढ होत असते. पक्ष्यांना फास लागण्याच्या सर्वाधिक घटना घडत असतात. २०२३ वर्षाचे १२ महिने, तर २०२४ चा जानेवारी महिना अशा महिन्यात १२० पक्ष्यांना मांजाचा फास लागण्याची घटना घडली.

त्यातील ११३ पक्ष्याना अग्निशामक विभागामुळे जीवदान मिळाले. तर ७ पक्ष्यांना प्राण गमवावे लागले. फास लागलेल्या पक्ष्यांमध्ये सर्वाधिक कबुतरे त्यापाठोपाठ कावळ्यांची संख्या आहे. ३२ कबूतरे तर २८ कावळे अशी संख्या आहे. प्रशासन तसेच पोलिस आणि वन विभागाच्या दुर्लक्षामुळे बंदी असूनही सर्रास बाजारात नायलॉन मांजा विक्री होत असल्याने अशा घटना घडत असतात.

Fire department
Nashik News : डॉक्‍टर, रुग्‍णांसाठी ‘ASI’ची पंचसूत्री : डॉ. प्रोबल नियोगी

सामान्य नागरिकांसह अग्निशामक विभागास याचा मनस्ताप सहन करावा लागतो. नागरिकांना भीतीच्या सावटात वापरावे लागते. तर अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालून पक्ष्यांची सुटका करावी लागत असते. अनेक कर्मचारी कर्तव्य बजावत असताना जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

असे असले तरी गेल्या १३ महिन्यात अग्निशामक विभागाने नायलॉन मांजाच्या फासातून पक्ष्यांची सुटका करण्यात सेंच्युरी केली आहे. अजूनही काही ठिकाणी अशा घटना घडत आहे. नायलॉन मांज्यावर कायमस्वरूपी बंदी आणावी. अशी मागणी यानिमित्ताने नागरिकांनी केली आहे.

Fire department
Nashik News : डॉक्‍टर, रुग्‍णांसाठी ‘ASI’ची पंचसूत्री : डॉ. प्रोबल नियोगी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com