गॅरेज मध्ये आग लागून ७ दुचाकी जळून खाक

बाणगाव बुद्रुक : बाबासाहेब गायकवाड यांचा गॅरेजला आग लागून खाक झालेल्या दुचाकी व साहित्य
बाणगाव बुद्रुक : बाबासाहेब गायकवाड यांचा गॅरेजला आग लागून खाक झालेल्या दुचाकी व साहित्यesakal

बाणगाव बुद्रुक (जि. नाशिक) : येथे गॅरेजमध्ये आग लागून, कामासाठी आलेल्या सात दुचाकीसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १३) रात्री घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.

बाणगाव बुद्रुक येथे नांदगाव - येवला रोडलगतच्या पत्र्याच्या गाळ्यात बाबासाहेब गायकवाड यांचे दुचाकी रिपेअरिंगचे गॅरेज असून, ते सायंकाळी पाचला दुचाकीचे साहित्य घेण्यासाठी गॅरेज बंद करून नांदगावला गेले.

त्यावेळी रात्री ७ :३० ते ८ च्या सुमारास सरपंच संगीता बागूल यांना गॅरेजमधून मोठ्या प्रमाणावर धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी परिसरातील नागरिकांना माहिती दिली. नागरीकांनी आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, गॅरेजमध्ये कामासाठी असलेल्या ७ दुचाकी व स्पेअरपार्ट, शेजारच्या गाळ्यातील संसारोपयोगी साहित्य जळून अंदाजे ७ लाख रुपयांचे नुकसान झाले.

ग्रामसेवक युवराज निकम, सरपंच संगीता बागूल, उपसरपंच नारायण कवडे, ग्रामपंचायत सदस्य शांतारामकाका कवडे, रवींद्र कवडे, सोमनाथ भामरे यांनी पंचनामा केला. गॅरेजमध्ये अचानक आग कशी लागली, याबाबत तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहे.

माणिकपुंज येथील आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या कुटुंबातील होतकरू युवक बाबासाहेब गायकवाड यांनी आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी नुकतेच दुचाकी रिपेअरिंगचे गॅरेज सुरू केले होते.

बाणगाव बुद्रुक : बाबासाहेब गायकवाड यांचा गॅरेजला आग लागून खाक झालेल्या दुचाकी व साहित्य
नाशिक : धावत्या बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने 30 प्रवासी बचावले

त्यात अशी घटना घडल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने युवक हतबल झाले आहेत. शासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई देऊन आधार द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

बाणगाव बुद्रुक : बाबासाहेब गायकवाड यांचा गॅरेजला आग लागून खाक झालेल्या दुचाकी व साहित्य
Video: लग्न होताच नवरा-बायकोने स्वतःला पेटवून घेतलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com