
Video: लग्न होताच नवरा-बायकोने स्वतःला पेटवून घेतलं
सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर तर काही अचंबित करणारे तर काही धक्कादायक असतात. अशातच अंगावर शहारे आणणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नवरा-नवरीने लग्न होताच स्वतःलाच आग लावून पेटवून घेतलंय. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल पण हे खरंय.
हेही वाचा: दुष्काळाच्या वारंवारतेत हवामान बदलामुळे वाढ
या व्हिडीओमध्ये लग्न झालेले जोडपे स्वत:ला पेटवून घेतलेले दिसत आहे. मात्र व्हिडीओ पाहताना नंतरच्या क्षणात तुम्हाला कळेल की हा एक स्टंट होता.
या व्हिडीओमध्ये दोघे नवरा नवरी एकमेकांच्याच हातात हात घालून उभे असतात. त्यात नवरीच्या हातात असलेल्या बूकेला आग लावली जाते. त्यानंतर दोघांनाही पाठीमागून पेटवले जाते. या जोडप्यांना त्यांचं लग्न अविस्मरणीय करायचं होतं. त्यामुळे हटके करण्याच्या हेतूने त्यांनी हा स्टंट करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा: Reels बनवायला आवडतं? कमवा महिन्याचे तीन लाख, Facebook ची मोठी घोषणा
लग्नाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र हा व्हिडीओ पाहून सर्वजण अचंबित झाले. सोशल मीडियावरुन नेटकरी या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया देत आहे.
Web Title: A Newlywed Couple Fire Themselves A Shocking Video Goes Viral On Social Media
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..