esakal | रात्री फेरफटका मारताना...अचानक मोठा धूर अन् केमिकलचा उग्र वास..मग..

बोलून बातमी शोधा

vinchur fire.jpg

लक्ष्मीनारायण कॉम्प्लेक्‍समध्ये प्रल्हाद खडांगळे यांचे संकल्प बायोटेक दुकान आहे. सायंकाळी कर्मचारी दुकान बंद करून घरी गेले. रात्री साडेदहाच्या सुमारास दोघे तीन पाटीवर फेरफटका मारत असताना, त्यांना दुकानातून मोठा धूर येताना दिसला. तसेच केमिकलचा उग्र वास येत असल्याचे लक्षात आले.. त्यानंतर...

रात्री फेरफटका मारताना...अचानक मोठा धूर अन् केमिकलचा उग्र वास..मग..
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विंचूर येथील तीन पाटीवरील लक्ष्मीनारायण कॉम्प्लेक्‍समधील कीटकनाशके, बी-बियाणे, खते विक्रीच्या संकल्प बायोटेक दुकानाला सोमवारी (ता. 17) मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आगीत खोक्‍यात भरलेल्या रासायनिक औषधांच्या बाटल्या, बी- बियाणे, खते खाक झाल्याने सुमारे 35 ते 40 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दुकान कॉंक्रिटचे असल्याने आजूबाजूला आग पसरली नाही. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. 

असा घडला प्रकार...

येथील लक्ष्मीनारायण कॉम्प्लेक्‍समध्ये प्रल्हाद खडांगळे यांचे संकल्प बायोटेक दुकान आहे. रविवारी (ता. 16) सायंकाळी कर्मचारी दुकान बंद करून घरी गेले. रात्री साडेदहाच्या सुमारास दोघे तीन पाटीवर फेरफटका मारत असताना, त्यांना दुकानातून मोठा धूर येताना दिसला. तसेच केमिकलचा उग्र वास येत असल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत दुकानावरील कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. तत्काळ येऊन कर्मचाऱ्यांनी दुकान उघडले. नागरिकांनी टॅंकरने आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग आटोक्‍यात येत नसल्याचे बघून अग्निशमन दलाचे बंब बोलावण्यात आले. येवला व पिंपळगाव येथील अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्‍यात आणली. 

हेही वाचा > PHOTOS : "तूच का पेटवून घेते, मीच पेटवून घेतो' असे म्हणून तिच्या हातातील बाटली ओढली...पण...

हेही वाचा > "माझ्यासोबत गाडीवर चल" असे सांगून तिला घरी घेऊन गेला..अन्..