esakal | कोरोनामुक्त राहाण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी; पालकमंत्री भुजबळ यांचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

Chhagan Bhujbal.

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरतो आहे. ११ हजारांच्या आसपासची रुग्णसंख्या आज तीन हजारांवर आली आहे. ऑक्सिजनवर केवळ ४५० रुग्ण असून, दिवसाला दहा टन ऑक्सिजनची गरज असताना रोज ५० टन (पाचपट) ऑक्सिजन उपलब्ध आहे. ५० रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, २५० व्हेंटिलेटरची क्षमता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात लाट आली तरी जास्तीच्या क्षमतेने प्रतिकाराला सज्ज राहण्याच्या सूचना प्रशासकीय यंत्रणांना दिल्या आहेत. 

कोरोनामुक्त राहाण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी; पालकमंत्री भुजबळ यांचे आवाहन

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : पहिली लाट ओसरल्यानंतर वाढत्या थंडीसोबत कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, असा आरोग्यविषयक संस्थाचा अंदाज आहे. त्यासाठी जिल्ह्यातील शासन-प्रशासन सजग आहे. पण नागरिकांनीही कोरोनामुक्तीसाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलिस आयुक्त दीपक पांडे, पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रेखा रावखंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. अतुल वडगावकर उपस्थित होते. 

हेही वाचा > समाजकंटकाचेच षड्यंत्र! वाळलेले कांदारोप बघून शेतकऱ्याला धक्काच; अखेर संशय खरा ठरला

११ हजारांहून तीन हजार 

भुजबळ म्हणाले, जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरतो आहे. ११ हजारांच्या आसपासची रुग्णसंख्या आज तीन हजारांवर आली आहे. ऑक्सिजनवर केवळ ४५० रुग्ण असून, दिवसाला दहा टन ऑक्सिजनची गरज असताना रोज ५० टन (पाचपट) ऑक्सिजन उपलब्ध आहे. ५० रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, २५० व्हेंटिलेटरची क्षमता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात लाट आली तरी जास्तीच्या क्षमतेने प्रतिकाराला सज्ज राहण्याच्या सूचना प्रशासकीय यंत्रणांना दिल्या आहेत. 

डॉ. अतुल वडगावकरांचे कौतुक 

गंगापूर रोडवर डॉ. अतुल वडगावकर यांनी कोरोना क्लिनीक सुरु ठेवत २ हजार रुग्णांना कोरोनामुक्त केले. गृहविलगीकरणातून रूग्णांवर उपचार करण्याची नवी संकल्पना त्यांनी राबवली या संकल्पनेचे कौतुक करून ग्रामीण भागात हा पॅटर्न राबविण्याबात शिफारस करण्यात येईल,असेही भुजबळ यांनी सांगितले. 

हेही वाचा > शेडनेट पंजाच्या सहाय्याने फाडून आत शिरण्यात बिबट्या अयशस्वी; तरीही डाव साधलाच

आरोग्यविषयक स्थिती 

० व्हेन्टीलेटरवरील रुग्ण संख्या : ५० 
० व्हेन्टीलेटरची उपलब्धता : २५० 
० दैनंदिन मृत्यूचे प्रमाण १५ ते २० वरुन आता : २ ते ६ पर्यंत 
० राज्याचा कोरोना मृत्यूदर : २.६३ टक्के 
० जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर : १.६५ टक्के 
० कोरोनामुक्तीचे जिल्ह्याचे प्रमाण : ९२ टक्के 
० कोरोना मृत्यूंमध्ये राज्यात जिल्ह्याचा क्रमांक : ३० वा 
० कोरोना रुग्णांचा ‘डबलिंग रेट' ; १४६ दिवसांचा 
 

loading image
go to top