Nashik Crime News : पिंपळद शिवारात जमिनीच्या वादातून गोळीबार

Crime
Crimeesakal

नाशिक : वाडीवऱ्हे पोलिस ठाणे हद्दीतील पिंपळद शिवारात जमिनीच्या वादातून टोळक्याने दोघांवर गोळीबार केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात संशयित अनिल सातपुते, वसंत मगर, आनंद शिंदे व इतरांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (Firing over land dispute in Pimpald Shivara Nashik Crime News)

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

Crime
Sangli Crime News : माजी नगरसेवक हत्या प्रकरणी चौघांना अटक; भाजप नेताच निघाला मुख्य सुत्रधार

समाधान अशोक अहिरे (रा. मालधक्का रोड, नाशिक रोड) यांच्या फिर्यादीनुसार, ते पिंपळद शिवारात शुक्रवारी (ता. १७) रात्री असताना संशयितांनी तेथे आरडाओरड केला. त्यामुळे समाधान हे बाहेर आले असता संशयितांनी त्यांना शिवीगाळ करीत दमदाटी केली.

तसेच संशयित वसंत मगरने दिलेल्या चिथावणीनुसार अनिलने समाधान यांच्यासह आणखी एकावर गोळीबार करीत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. इतर संशयितांनी परिसरातील दुचाकीची जाळपोळ केली.

या घटनेनंतर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयितांची धरपकड करण्यासाठी पथक शोध घेत आहेत. या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलिस तपास करीत आहेत.

Crime
Nashik Crime News : गोळीबाराच्या अडीच महिन्यात 3 घटना! शहरवासीयांत भीती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com