
Nashik News : दुष्काळी परिस्थिती व डाळिंबावरील तेल्या रोगाचा प्रादुर्भावाचा यशस्वी सामना करत सातमानेच्या जाधव बंधूंनी निर्यातक्षम उत्पादन घेतले आहे. रवींद्र व विनोद जाधव या भावंडांनी उत्पादित केलेला लालबुंद डाळिंब बांगलादेशात रवाना होत आहे.
त्यांच्या डाळिंबाला जागेवरच १२० रुपये किलोपर्यंत भाव मिळाला आहे. पाणी व्यवस्थापन व बागेची योग्य काळजी घेत त्यांनी पीक फुलविले. आई कासूबाई व बागेतील पाच मजूर जोडप्यांच्या हस्ते बागेची पूजा करत त्यांचा डाळिंब सातासमुद्रापार निघाला आहे. (Produced by siblings Jadhav pomegranates are being shipped to Bangladesh nashik news)
कसमादे पट्ट्यात गेल्या पाच ते सात वर्षापासून डाळिंबाचे पीक पुन्हा बहरले आहे. पिकावरील विविध रोगांचा प्रादुर्भाव रोखत कसमादेतील डाळिंब उभारी घेत आहे. कोराना काळात देखील बळीराजाराला डाळिंबाने साथ दिली.
गेल्या पाच वर्षापासून डाळिंबाचे भाव ५० रुपयापेक्षा अधिकच राहिले आहेत. यावर्षी देखील साधारण डाळिंब ७० ते ८० रुपये किलोने विकला जात आहे. मध्यम प्रतीचा डाळिंब ८० ते १०० रुपये तर निर्यातक्षम डाळिंब १०० ते १२५ रुपये किलोने विक्री होत आहे.
पालकमंत्री दादा भुसे यांनी सातमाने दत्तक घेतलेले गाव आहे. सातमाने हे डाळिंबाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. डाळिंबानेच गावात सुबत्ता आणली. डाळिंबाच्या प्रेमात पडलेल्या जाधव बंधूंनी वडिलांच्या नावाने कृष्णा नर्सरी सुरु केली.
या नर्सरीतून कसमादेसह राज्यातील शेतकऱ्यांना डाळिंबाची रोपे पुरविली. कर्नाटक, राजस्थान, गुजरात या भागात डाळिंब विस्तारण्यास कृष्णा नर्सरीचा मोठा वाटा राहिला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
जाधव बंधूंनी बाग फुलवितांना आधुनिकतेची कास धरली आहे. मजूर टंचाईवर मात करण्यासाठी बागेतील बहुतांशी कामे आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने केली जातात. त्यांच्या आंबे बहारातील डाळिंब काढणीस सुरवात झाली आहे. सर्व माल निर्यात केला जात आहे.
शेडनेटमध्ये टोमॅटो, मिरची
प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी डाळिंबाचे व्यवस्थापन केले असून राज्यभरातील शेतकरी त्यांची बाग पाहण्यासाठी येत आहेत. डाळिंबाबरोबरच जाधव बंधूंनी शेडनेटचा वापर करत इनलाईन शिमला मिरचीचे उत्पन्न घेतले आहे. शेडनेटमध्येच टोमॅटोचे पीक घेतले. यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळाले. प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांची ख्याती आहे. राज्य शासनाच्या आदर्श शेतकरी पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
"कुटुंबीयांबरोबरच कायमस्वरूपी असलेल्या मजुरांच्या अपार मेहनतीमुळे उत्पादन यशस्वी झाले. वेळोवेळी फवारण्या व कृषी विभागाच्या सल्ल्याने बागेचे व्यवस्थापन केल्याने रोगाला अटकाव घालता आला. बागेची योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास तेल्या रोगाला अटकाव घालता येऊ शकतो. शेतकऱ्यांना डाळिंबाएवढे उत्पन्न इतर कोणतेही फळपीक देत नाही. तरुण शेतकऱ्यांनी बागेचे संगोपन करताना योग्य व्यवस्थापन व मेहनत घेतल्यास फळ निश्चित मिळेल." - विनोद जाधव, डाळिंब उत्पादक, सातमाने
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.