रमजान पर्वाचा पहिला रोजा उत्साहात; 2 वर्षांनंतर इफ्तार बाजार फुलला

Ramadan
Ramadanesakal

जुने नाशिक : रमजान पर्वाचा पहिला रोजा (उपवास) उत्साहात झाला असून, मुस्लिम बांधवांमध्ये चैतन्याचे वातावरण होते. विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारच्या निर्बंधाशिवाय पर्व साजरे होत असल्याने दोन वर्षांनंतर इफ्तार बाजार गर्दीने फुलला होता.

इस्लाममध्ये रमजानपर्व अर्थात रोजा करणे याला विशेष महत्त्व आहे. महिनाभर पर्व साजरे केले जाते. शनिवारी (ता. २) चंद्रदर्शन घडल्याने रमजान पर्वास सुरवात झाली. रविवारी (ता. ३) पहिलाच रोजा असल्याने मुस्लिम बांधवांमध्ये मोठा उत्साह होता. लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत बहुतांशी जणांनी पहिला रोजा केला. घरातील चिमुकल्यांनीदेखील रोजा केल्याने कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यातही बहुतांशी चिमुकल्यांचा जीवनातील पहिला रोजा असल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये तर अधिकच उत्साह होता. त्यांच्यासाठी नवीन कपडे खरेदी करण्यात आले. त्यांना आवडणारे खाद्यपदार्थ, फळफळावळ आणून त्यांचा रोजा इफ्तार (सोडण्यात) आला. तत्पूर्वी त्या चिमुकल्यांना नवीन कपडे परिधान करत फुलांनी सजवून बडी दर्ग्यासह त्यांच्या भागातील विविध दर्ग्यांमध्ये दर्शन घडवून आणण्यात आले.
पहिला रोजा असल्याने मुस्लिम बांधवांनी वेळ दिवसभर इबादतमध्ये घालविला. सकाळपासून सायंकाळपर्यंत मशिदीमध्ये नमाज आणि कुराणपठण करण्यात आले. विशेष म्हणजे गेली दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे प्रशासनाकडून असलेल्या विविध प्रकारच्या निर्बंधांमुळे मुस्लिम बांधवांना अतिशय साध्या पद्धतीने पर्व साजरे करावे लागले होते. घरात असलेल्या पदार्थांचा वापर करत रोजा इफ्तार करावा लागत होता. यंदा मात्र सरकारकडून निर्बंध उठविण्यात आल्याने मनमोकळेपणाने पर्व साजरे करण्याचा योग आला. विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तसेच इफ्तारसाठी लागणाऱ्या अन्य वस्तू खरेदीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.

Ramadan
उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध - जिल्हाधिकारी गंगाथरण डी.

रविवारचे औचित्य

कामानिमित्ताने काही मुस्लिम बांधवांना रोजा करणे शक्य होत नसते. असे असले तरी त्यांच्याकडून पहिला रोजा शक्यतो केलाच जातो. त्यात योगायोगाने रविवार सुटीच्या दिवशी रमजान पर्वाचा पहिला रोजा आला. नोकरी करणाऱ्यांना, शाळकरी मुलांना चांगली संधी मिळाली. कार्यालय, शाळा बंद असल्याने त्यांनी पहिला रोजा करत घरातच इबादतमध्ये वेळ घालविला. सुटी असल्याने बहुतांशी चिमुकल्यांचादेखील पहिला रोजा निर्विघ्न पार पडला.

Ramadan
नाशिक : पालकमंत्र्यांनी केली स्मार्ट सिटी कामांची पाहणी; पाहा PHOTOS

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com