Nashik News: कादवा साखर कारखान्याकडून पहिला हप्ता वर्ग! ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2500 रुपये जमा

Sugar Factory
Sugar Factoryesakal

लखमापूर : कादवा सहकारी साखर कारखान्याने यंदा गाळप केलेल्या ऊसाच्या एफआरपी बिलापोटी पहिला हप्ता २५०० रुपये प्रतिटन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहेत, अशी माहिती कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी दिली. (First installment class from Kadwa Sugar Factory 2500 deposited in bank account of sugarcane farmers Nashik News)

कादवा सहकारी साखर कारखान्याने यंदाचा गळीत हंगाम सुरू केला असून, आजअखेर ६४,३०७ टन ऊसाचे गाळप झाले आहे. सरासरी साखर उतारा १०.०१ टक्के मिळाला. ६४, १०० क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे.

डिस्टीलरी प्रकल्पही सुरू असून, ४,४९,२०५ लिटर स्पिरीटची निर्मिती झाली आहे. अत्यंत बिकट स्थितीत सर्व साखर कारखाने वाटचाल करीत असताना, कादवाने ऊसाच्या एफआरपी बिलापोटी पहिला हप्ता २५०० दिला आहे.

ऊसतोडीचा कार्यक्रम आखत योग्य नियोजन केले आहे. वेळेत ऊसतोड होणार आहे.

Sugar Factory
Ashti Sugar Factory : 'आष्टी शुगर' साखर कारखान्याने केला 2 हजार 700 रुपये प्रति टन दर जाहीर

सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कादवाला ऊसपुरवठा करावा, असे आवाहन चेअरमन श्रीराम शेटे, व्हाइस चेअरमन शिवाजीराव बस्ते यांनी केले. या वेळी सर्व संचालक, प्रभारी कार्यकारी संचालक विजय खालकर, सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

कादवाचे गाळप पूर्ण क्षमतेने सुरू आहे. कादवा ऊसाला सर्वाधिक दर सातत्याने देत आला आहे. हंगाम संपताच शासन नियमानुसार अंतिम एफआरपी दर ठरणार आहे. वेळेत एफआरपी अदा करत सर्वाधिक ऊसाला दर देण्याची परंपरा कायम राखली जाणार आहे.

शेतकऱ्यांनी कोणतीही घाई न करता ऊस तोडणी कार्यक्रमानुसार ऊसतोड करत कारखान्याच्या उज्वल भवितव्यासाठी कादवालाच ऊसपुरवठा करावा, असे आवाहन श्रीराम शेटे यांनी केले आहे.

Sugar Factory
Sugar Factory : उसाला FRP 500 रुपये द्या, अन्यथा शेतकऱ्यांसोबत..; 'स्वाभिमानी'नंतर रयत संघटनेचा साखर कारखान्यांना स्पष्ट इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com