Nashik News: पहिल्याच सभेत सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी धरले धारेवर! पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ‘तू तू मैं मैं'

Pimpalgaon baswant market committee
Pimpalgaon baswant market committeeesakal

Nashik News : आशिया खंडात प्रथम क्रमांकावर असलेल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पहिल्याच मासिक सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी धारेवर धरले. यामुळे ही सभा चांगलेच वादळी ठरली.

यात आमदार तथा सभापती दिलीप बनकर व संचालक गोकूळ गिते यांच्यात ‘तू तू मैं मैं’ देखील झाली. (first meeting opposition held ruling party on edge meeting of Pimpalgaon Baswant Bazaar Committee Nashik News)

नाशिक जिल्ह्यात बहुचर्चित असलेल्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार दिलीप बनकर यांच्या शेतकरी विकास पॅनल व माजी आमदार अनिल कदम यांच्या लोकमान्य परिवर्तन पॅनलमध्ये झालेल्या सरळ लढतीत अठरापैकी अकरा जागा मिळवीत बनकर यांनी गड राखला.

माजी आमदार अनिल कदम यांच्या लोकमान्य परिवर्तन पॅनलला सहा जागांवर विजय मिळविता आला. दरम्यान, बुधवार (ता.७) रोजी पहिली मासिक सर्वसाधारण सभा झाली. यात विरोधी पॅनलचे माजी आमदार अनिल कदम यांनी मुख्य बाजार आवार वगळता अन्य उपबाजार यांच्या दुरवस्थेबाबत मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

तसेच संचालक गोकूळ गिते यांनीही आमदार तथा सभापती बनकर हे पदाचा गैरवापर करीत गल्लीपासून दिल्लीपर्यंत बाजार समितीच्या वाहनाचा वापर करतात, असा गंभीर आरोप केला. सदर वाहन हे बाजार समितीचे कामकाज करत असतानाच वापरणे गरजेचे आहे, इतर ठिकाणी त्यांचे खासगी वाहन वापरावे, अशी सूचना देखील गिते यांनी केली.

गिते यांनी बाजार समितीत रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या रोख मानधन/पगाराबाबत मुद्दा उपस्थित केला. या कर्मचाऱ्यांना रोख वेतन न देता ते अकरा महिन्यांचा करार करीत त्यांच्या बँक खात्यावर किंवा धनादेशाने अदा करण्यात यावे, असे नमूद केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Pimpalgaon baswant market committee
Nashik News : दिंडोरीत गुरुमाऊलींचे आज सेवेकऱ्यांशी हितगूज

तसेच प्रशासक काळात जे कर्मचारी सभापती यांच्या सेवेत होते, त्यांची चौकशी करून निलंबन करावे. या मुद्द्यावरही सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

आमदार बनकर व संचालक गोकूळ गिते यांच्यात तू-तू मैं-मैं

पिंपळगाव बसवंत बाजार समितीची पहिलीच मासिक सभा वादळी ठरली. यात सत्ताधारी व विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. यात गोकूळ गिते यांनी सभापती बनकर हे वापरत असलेल्या वाहनाच्या मुद्द्याहून त्यांना कैचीत पकडले.

बनकर हे सदर वाहन बाजार समितीच्या कामकाजाव्यतिरिक्त मुंबई-दिल्ली वारीसाठी वापरत असल्याचा आरोप केला. तसेच सभापती महोदय हे आमदार असून, त्यांना प्रवासासाठी शासनाकडून विविध भत्तेदेखील मिळतात, त्यामुळे त्यांनी पदाचा गैरवापर थांबवावा, हा मुद्दा प्रकर्षाने मांडला.

यावेळी आमदार तथा सभापती दिलीप बनकर व संचालक गोकूळ गिते यांच्यामध्ये 'तू तू मैं मैं'देखील झाल्याचे पाहायला मिळाले.

Pimpalgaon baswant market committee
ZP School Corruption : ZPतही शिक्षणाचा काळा बाजार; टप्प्याटप्प्यावर फायलींवर ठेवावे लागते वजन...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com