esakal | संपूर्ण प्लॅनिंग झाली होती 'त्यांची'...पोलीसांना आला संशय अन् धक्काच
sakal

बोलून बातमी शोधा

daroda nashik road.jpg

(जेल रोड) येथे गस्त घालीत असताना बिटकोकडे दोन वाहने भरधाव जाणाऱ्या दोन दुचाकी चालकांना पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते पसार झाले. त्यामुळे त्यांचा पोलिसांना संशय आल्याने पाठलाग करीत, त्यांना पकडले त्यांची चौकशी केली असता पोलीसांना धक्काच बसला.

संपूर्ण प्लॅनिंग झाली होती 'त्यांची'...पोलीसांना आला संशय अन् धक्काच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : (जेल रोड) येथे गस्त घालीत असताना बिटकोकडे दोन वाहने भरधाव जाणाऱ्या दोन दुचाकी चालकांना पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते पसार झाले. त्यामुळे त्यांचा पोलिसांना संशय आल्याने पाठलाग करीत, त्यांना पकडले त्यांची चौकशी केली असता पोलीसांना धक्काच बसला.

असा घडला प्रकार

नाशिक रोड गुन्हे शोध पथकातील हवालदार सुनील कोकाटे, घुगे पाटील, विखे, शेख आदींचे पथक शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास इंगळेनगर (जेल रोड) येथे गस्त घालीत असताना बिटकोकडे दोन वाहने भरधाव जाणाऱ्या दोन दुचाकी चालकांना पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते पसार झाले. त्यामुळे त्यांचा पोलिसांना संशय आल्याने पाठलाग करीत, त्यांना पकडले त्यांची चौकशी केली असता, उमेश संजय बुचडे (धनगर गल्ली, देवळालीगाव), हृषीकेश अशोक निकम (गुलाबवाडी, देवळाली गाव), सागर सुरेश म्हस्के (जेल रोड), अनिकेत राजू जॉन (सुभाष रोड नाशिक रोड), सिद्धार्थ सचिन धनेश्‍वर (चव्हाण मळा, जय भवानी रोड) अशी संशयितांची नावे असल्याचे निष्पन्न झाले. त्यातील एक संशयित पळून गेला. 

पोलिस कर्मचाऱ्यांना पारितोषिक घोषित

पोलिसांनी पकडलेल्या सर्वांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन लोखंडी कोयते, नायलॉनची दोरी, मिरची पूड, असे साहित्य आढळून आले. संबंधित संशयित आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी सांगितले. या सर्वांना न्यायालयात उभे केले असता त्यांना सोमवार (ता. 8)पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. या कामगिरीबद्दल पोलिस उपायुक्त विजय खरात यांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना पारितोषिक घोषित केले आहे.

हेही वाचा > आरोग्यदायी जांभळाची वाईन बाजारात दाखल...लवकरच देशभरात उपलब्धता..वाचा सविस्तर

सहा जणांच्या टोळीतील एकजण फरारी

दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दरोडा टाकण्याच्या हत्यारासह ताब्यात घेतले. पोलिसांनी पकडलेले संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, या सर्वांना शनिवारी न्यायालयात उभे केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. सहा जणांच्या टोळीतील एकजण फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

हेही वाचा > संजय राऊत ऐकलतं का?...'सोनू सूदच्या पाठीशी गिरीश महाजन खंबीरपणे उभे आहे हं!'

loading image