बालहट्टापुढे कोणाचे चाले! 5 वर्षाच्या कैवल्यकडून रामशेज किल्ला सर; तेही अवघ्या 38 मिनीटांत

kaivalya.jpg
kaivalya.jpg

नाशिक : (जेलरोड) वाढदिवस म्हंटला की लहान मुलांसाठी आंनदोत्सवाचाच दिवस. त्यादिवशी मे हे करणार, मला ते पाहिजे. काय - काय ते बालहट्ट असता. पण, मुलाला गड किल्ल्यांची माहिती व्हावी या हेतुने जेलरोड येथील चेतन देशमुख व्यक्तीने मुलाचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या प्रकारे साजरा केला आहे. एकदा वाचाच

अवघ्या 38 मिनिटांत किल्ला सर...

कैवल्य चेतन देशमुख याचा शनिवारी (ता. 31) 5 वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने कैवल्यला गड-किल्ल्यांची माहिती व्हावी, या हेतुने कैवल्यच्या वडिलांनी त्याला रामशेज किल्ल्याची माहिती दिली. माहिती देऊनच न थांबता ते थेट निघाले रामशेजवर. अवघ्या पाच वर्षाच्या कैवल्याने न थकता रामशेज गाठला. कैवल्य रामशेज किल्ल्यावर लावलेला ध्वज पाहुन खुश झाला. पायथ्याशी उभा असलेल्या त्या लेकराने रामशेज एकाच टप्प्यात पुर्ण केला. 38 मिनिटांमध्ये त्याने किल्ला सर केल्याची माहिती त्याचे वडील चेतन देशमुख यांनी दिली. वाढदिवस म्हंटला की पार्टी, केक, सेलिब्रेशन या गोष्टींकडे मुलांचा कल असतो. परंतु वाढदिवसाच्या निमित्ताने कैवल्यने किल्ला सर करत एक वेगळा आदर्श निर्माण केलाय. त्यामुळे परिसरात देखील त्याचं कौतुक करण्यात येतंय.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा पुढच्या पिढ्यांना माहीत व्हावा. आपल्या गडकिल्ल्यांचे महत्व अबाधित रहावे, या हेतुने मी कैवल्यला रामशेज किल्ल्यावर नेले. पहिल्याच प्रयत्नात कैवल्य किल्ला चढेल असं वाटलं नव्हतं. पण त्याने एकही थांबा न घेता थेट किल्ल्यावरच्या मंदीरातच थांबा घेतला. पुढच्या वाढदिवशी शिवनेरी सर करण्याचा आमचा मानस आहे. - चेतन देशमुख, वडील


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com