esakal | राज्यातील नेत्यांचा फोकस मालेगाववर..विविध मंत्र्यांचा थेट हस्तक्षेप 
sakal

बोलून बातमी शोधा

malegaon kasar.jpeg

मालेगावात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठा आहे. महापालिका आयुक्तापासून पोलिस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यापासून तर आरोग्य विभागातील एका विभागापर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. 3 एप्रिलपासून उग्र रूप धारण केलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव 28 एप्रिल ते 10 मेदरम्यान टिपेला होता. नेमक्‍या याच काळात राज्याच्या नेत्यांनी मालेगावच्या यंत्रणेचा विश्‍वास वाढविण्याचा प्रयत्न केला.

राज्यातील नेत्यांचा फोकस मालेगाववर..विविध मंत्र्यांचा थेट हस्तक्षेप 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुंबई- पुण्यासह मालेगावही राज्यातील कोरोनाबाधित शहरांपैकी प्रमुख शहर म्हणून पुढे येत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मालेगाववर पूर्णपणे फोकस केला आहे, तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मालेगावला दत्तक घेतले आहे. कृषिमंत्री दादा भुसे व पालकमंत्री छगन भुजबळ मालेगावात तळ ठोकून आहेत. विविध मंत्री येथील यंत्रणेच्या संपर्कात राहून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सक्रिय आहेत. 

मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचा थेट संवाद 
मुख्यमंत्री ठाकरे यांनी थेट मालेगावच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून काय हवे, नको, हे जाणून घेतले व वैद्यकीय यंत्रणेचा विश्‍वास वाढविला. उपमुख्यमंत्री पवार यांनी मालेगावला आर्थिक चणचण भासू देणार नाही, असे आश्‍वासन दिले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मालेगाववर लक्ष देण्याचे निर्देश दिल्याने आरोग्यमंत्र्यांनी येथे दोनदा भेटी देऊन पाहणी केली. पालकमंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मालेगावला दौरे केले. आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी "एसएमबीटी'च्या मदतीने मालेगाव पोलिसांच्या वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या. 

हेही वाचा > धक्कादायक! राजकीय संबंधाचा घेतला गैरफायदा...महिलेवर केला अत्याचार

विविध मंत्र्यांचा थेट हस्तक्षेप
मालेगावात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठा आहे. महापालिका आयुक्तापासून पोलिस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यापासून तर आरोग्य विभागातील एका विभागापर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. 3 एप्रिलपासून उग्र रूप धारण केलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव 28 एप्रिल ते 10 मेदरम्यान टिपेला होता. नेमक्‍या याच काळात राज्याच्या नेत्यांनी मालेगावच्या यंत्रणेचा विश्‍वास वाढविण्याचा प्रयत्न करताना, आयएएस अधिकारी डॉ. पंकज आशिया, एक अप्पर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, समन्वय अधिकारी म्हणून पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांची नेमणूक केली, पण यापुढे वेळोवेळी विविध मंत्र्यांनी थेट हस्तक्षेप करीत मालेगावातील कोरोनाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला.  

हेही वाचा > चोवीस तास बंदोबस्त असूनही 'त्याने' मारली शाळेतून दांडी?...धक्कादायक प्रकार

loading image