Women ST Bus Driver : नाशिक बसचे स्टेअरींग पहिल्यांदाच महिला चालकाच्या हाती!

first time ST Corporation steering is in hands of women nashik news
first time ST Corporation steering is in hands of women nashik newsesakal
Updated on

Women ST Bus Driver : एसटी महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांच्या हाती स्टिअरिंग आहे. नाशिक ते सिन्नर या मार्गावर प्रथमच एका महिला चालकाने एसटी महामंडळाची बस चालवली. (For first time ST Corporation steering is in hands of women nashik news)

माधवी साळवे असे या महिला चालकाचे नाव आहे. त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

माधवी साळवे या नाशिकमधील पहिल्या एसटी महिला ड्रायव्हर ठरल्या आहे. नाशिक मधील धुडगाव येथे राहणाऱ्या माधवी यांचा गृहिणी ते बस ड्रायव्हर असा प्रवास कौतुकास्पद आहे.. एसटी महामंडळाने सन 2019 च्या भरती प्रक्रियेत 206 महिलांची चालक या पदावर निवड केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

first time ST Corporation steering is in hands of women nashik news
Nashik News : सावधान...पाल्ये पोहण्यासाठी तर गेली नाहीत ना!

या सर्व महिलांना एक वर्ष हेवी व्हेईकल चालवण्याचे ट्रेनिंग देण्यात आले. त्यानंतर या महिलांनी एक वर्ष एसटी बस चालवण्याचा सराव केला. आणि आता या महिलांना एसटी बसवर रीतसर रूजू करून घेण्यात आले आहे.

माधवी यांना लहानपणापासून गाड्या चालवण्याची आवड आहे. एसटी महामंडळात कुणीही महिला नसल्याने एसटीची निवड केल्याचे माधवी सांगतात. जास्तीत जास्त महिलांनी या क्षेत्रात येण्याचे आवाहन त्यांनी केले.

first time ST Corporation steering is in hands of women nashik news
Sakal Exclusive : सावधान! येथे श्रमदान करायला येतात मृत मजुर...!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com