Nashik tourism fraud
sakal
नाशिक: परदेशात अत्यंत वाजवी किमतीमध्ये सहल आयोजित करण्याचे आमिष दाखवून शहरातील तिघांना सुमारे सात लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात विस्तारोवा इंटरनॅशनल को- ऑपरेटीव्ह सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी तक्रारीत वाढ होण्याची शक्यता आहे.