esakal | ‘हार्ट फेल्युअर’ साठी आता प्रगत उपचाराचा नवीन पर्याय..रुग्णांसाठी ठरणार वरदानच!
sakal

बोलून बातमी शोधा

heart failure.jpg

भारतातील ‘टाइप २’ मधुमेह असलेल्या प्रौढांमध्ये ‘ग्लाइसेमिक’वरील नियंत्रण सुधारण्यासाठी आहार आणि व्यायाम यांच्या बरोबरीने ‘डेपाग्लिफ्लोझिन’ (फोर्क्झिगा) हे औषध आनुषंगिक गोष्ट ठरणार आहे. ‘टाइप २’ मधुमेह रुग्णांमध्ये ‘हार्ट फेल्युअर’मुळे रुग्णालयात दाखल होण्याचा धोका कमी करण्यासाठीदेखील हे औषध मंजूर झालेले आहे. ​

‘हार्ट फेल्युअर’ साठी आता प्रगत उपचाराचा नवीन पर्याय..रुग्णांसाठी ठरणार वरदानच!

sakal_logo
By
प्रशांत कोतकर : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अ‍ॅस्ट्राजेनेका इंडिया (अ‍ॅस्ट्राजेनेका फार्मा इंडिया लिमिटेड) या विज्ञानप्रणीत बायोफार्मास्युटिकल कंपनीच्या ‘डेपाग्लिफ्लोझिन’ (फोर्क्झिगा) या हार्ट फेल्युअर (एचएफ) या आजारावरील औषधाला शासकीय मान्यता नुकतीच मिळाली. ‘एचएफ’ आजारावरील उपचारासाठी मंजुरी मिळालेले हे पहिलेच ‘अँटिडायबेटिक’ औषध आहे. हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी मृत्यूचा आणि रुग्णालयात दाखल व्हावे लागण्याचा धोका कमी करण्यासाठी हे पहिलेच सिद्ध औषध आहे. ही मंजुरी ‘डीएपीए-एचएफ’ अभ्यासाच्या निकालांवर आधारित असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. 

हार्ट फेल्युअर’ रुग्णांच्या उपचारांसाठी  ‘फोर्क्झिगा’
सध्याच्या उपचारांमध्ये ‘फोर्क्झिगा’चा समावेश झाला, तर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी मृत्यूचा किंवा ‘हार्ट फेल’ होण्याचा धोका २६ टक्क्यांनी कमी होतो, असे या अभ्यासात सिद्ध झाले आहे. या अभ्यासात सहभागी असलेल्या एकूण रुग्णांपैकी सुमारे एकचतुर्थांश रुग्ण भारत व अन्य आशियाई प्रदेशातील होते. भारतातील ‘टाइप २’ मधुमेह असलेल्या प्रौढांमध्ये ‘ग्लाइसेमिक’वरील नियंत्रण सुधारण्यासाठी आहार आणि व्यायाम यांच्या बरोबरीने ‘डेपाग्लिफ्लोझिन’ (फोर्क्झिगा) हे औषध आनुषंगिक गोष्ट ठरणार आहे. ‘टाइप २’ मधुमेह रुग्णांमध्ये ‘हार्ट फेल्युअर’मुळे रुग्णालयात दाखल होण्याचा धोका कमी करण्यासाठीदेखील हे औषध मंजूर झालेले आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! ऑटो गॅरेज, कोल्ड्रींक्स अन् मोबाईलच्या दुकानात चोरीछुपे सुरू प्रकार...शोध घेताच मोठा खुलासा

६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे रुग्ण होतात शिकार

पुरुषांमध्ये प्रोस्टेट व मूत्राशयाच्या कर्करोगाने आणि स्त्रियांमध्ये स्तनांच्या कर्करोगाने जितके मृत्यू होतात, तितकेच ‘हार्ट फेल’ होण्यामुळे होतात. ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. यातून या रुग्णांना आपल्या अनारोग्याचे व आर्थिक स्वरूपाचे ओझे किती सहन करावे लागते, हे दिसून येते. ‘हार्ट फेल्युअर’मुळे मृत्युमुखी पडणाऱ्या भारतीय नागरिकांचे सरासरी वय ६१.२ वर्षे इतके आहे. पाश्चिमात्य देशांमधील रुग्णांच्या सरासरीपेक्षा हा आकडा दहा वर्षांनी कमी आहे. 

हेही वाचा > आम्हाला पैसे दे.. नाहीतर पुलावरून फेकून देऊ" उड्डाणपुलावरील प्रकार पाहून पोलीसही थक्क

‘एचएफ’ रुग्णांसाठी वरदानच ठरणार

‘अ‍ॅस्ट्राजेनेका इंडिया’चे वैद्यकीय कार्य व नियामक विभागाचे उपप्रमुख डॉ. अनिल कुकरेजा यांनी सांगितले, की ‘हार्ट फेल्युअर’ या आजारावर सध्या उपचारपद्धती उपलब्ध असूनही, जागतिक पातळीवर तसेच भारतातही त्यासंबंधीच्या गरजा पूर्ण होत नाहीत. डेपाग्लिफ्लोझिन (फोर्क्झिगा) या औषधाच्या क्लिनिकल स्वरूपाच्या चाचण्या यशस्वी झाल्यावर त्यास मंजुरी मिळाल्यामुळे ‘हार्ट फेल्युअर’च्या रुग्णांना उपचार देण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. रुग्णालयांत वारंवार दाखल होणे, रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात तातडीने दाखल करण्याची वेळ येणे आणि अनेक उपचारपद्धती उपलब्ध असूनही ‘एचएफ’च्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी न होणे, या परिस्थितीमुळे या औषधाला मंजुरी मिळणे हे भारतातील ‘एचएफ’ रुग्णांसाठी वरदानच ठरणार आहे. 

भारतातील ‘हार्ट फेल्युअर’ आजार 
भारतात ‘एचएफ’च्या रुग्णांचे प्रमाण सध्याचे सुमारे ८० लाख ते एक कोटी इतके आहे. त्यात ‘इजेक्शन फ्रॅक्शन’ कमी असणाऱ्यांचे (हृदयातून रक्त कमी प्रमाणात ढकलले जाणाऱ्यांचे-एचएफआरइएफ) प्रमाण ५३ टक्के इतके आहे. भारतीयांमध्ये तरुण वयातच ‘एचएफ’चे प्रमाण मोठे आहे. उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे दोन्ही आजार एकाच वेळी असणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. हे आजार एकत्रित स्वरूपात असण्यामुळे भारतीय एचएफ रुग्णांमध्ये रुग्णालयात राहण्याचे प्रमाण जास्त आढळते. भारतात ‘हार्ट फेल्युअर’चे निदान झाल्यावर रुग्णालयातच मृत्यू पावण्याचे रुग्णांचे प्रमाण ९.७ टक्के इतके आहे, तर एक वर्षानंतरचा मृत्युदर २३ टक्के आणि तीन वर्षांनंतरचा मृत्युदर ४४.८ टक्के आहे. भारतीय रुग्णांमधील बहुविध आजारांच्या गुंतागुंतीमुळे, ‘एचएफ’च्या रुग्णांपैकी निम्म्या जणांना (बीबी ४८.८ टक्के, एसीईआय/एआरबी-४७.६ टक्के) ‘ऑप्टिमल थेरपी’ (ओएमटी) सुरू करावी लागते. 

loading image