esakal | भाजपच्या कार्यकारिणीत गिरीश पालवे कायम...तर हिमगौरी आडकेंकडे महिला आघाडीची धुरा!
sakal

बोलून बातमी शोधा

himgauri adke.jpg

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकारिणीला हिरवा कंदील दाखविताना पक्षबांधणीसाठी माजी नगरसेवक व इतर पक्षांतून आलेल्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. शहराध्यक्षपदी गिरीश पालवे कायम असून, महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी हिमगौरी आहेर-आडके यांची नियुक्ती करण्यात आली. तब्बल १२५ सदस्यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले. 

भाजपच्या कार्यकारिणीत गिरीश पालवे कायम...तर हिमगौरी आडकेंकडे महिला आघाडीची धुरा!

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : वर्षभरापासून रखडलेल्या भाजपच्या शहर कार्यकारिणीला बुधवारी (ता. १९) मुहूर्त लागला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकारिणीला हिरवा कंदील दाखविताना पक्षबांधणीसाठी माजी नगरसेवक व इतर पक्षांतून आलेल्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. शहराध्यक्षपदी गिरीश पालवे कायम असून, महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी हिमगौरी आहेर-आडके यांची नियुक्ती करण्यात आली. तब्बल १२५ सदस्यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले. 

भाजपच्या जम्बो कार्यकारिणीत माजी नगरसेवकांना स्थान 

शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी नियुक्ती जाहीर केली. शहरातील काही आमदारांचा नियुक्ती देताना विरोध होता. पक्षसंघटना, निष्ठा, संघटनेसाठी होत असलेले काम याचा विचार करून नियुक्त्या देण्यात आल्या. कार्यकारिणी अशी : अध्यक्ष- गिरीश पालवे, उपाध्यक्ष- रामहरी संभेराव, बाळासाहेब पाटील, माजी नगरसेवक हरिभाऊ लोणारी, कुणाल वाघ, यशवंत निकुळे, सचिन ठाकरे, प्रकाश घुगे, ॲड. अलका जांभेकर, नीलेश बोरा. संघटन सरचिटणीस- नगरसेवक प्रशांत जाधव, सुनील केदार, पवन भगूरकर, माजी नगरसेवक जगन पाटील. चिटणीस- राजेश आढाव, छाया देवांग, नगरसेवक स्वाती भामरे, अजिंक्य साने, ॲड. श्‍याम बडोदे, अणित घुगे, कोशाध्यक्ष आशिष नहार. 

हेही वाचा > दुर्दैवी! बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या 'त्या' बातमीने ममदापूर हळहळले..काय घडले नेमके?

नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी 

भारतीय जनता युवा मोर्चाची जबाबदारी मनीष बागूल यांच्याकडे सोपविताना महिला मोर्चाच्या शहराध्यक्षपदी हिमगौरी आहेर-आडके यांची नियुक्ती करताना नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली. अनुसूचित जाती मोर्चाच्या अध्यक्षपदी शशांक हिरे, किसान मोर्चाची जबाबदारी हेमंत पिंगळे यांच्याकडे, तर अनुसूचित जमाती मोर्चाची जबाबदारी माजी नगरसेवक प्रा. परशराम वाघेरे यांच्याकडे सोपविण्यात आली. अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षपदी फिरोज शेख, ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी चंद्रकांत थोरात यांच्याकडे देण्यात आली. विशेष निमंत्रितांमध्ये शहरातील तिन्ही आमदारांचा व ज्येष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला. 

हेही वाचा > धाबे दणाणले! नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही?कारवाई तर होणारच

संपादन - किशोरी वाघ

loading image
go to top