esakal | मालेगावचे माजी महापौर हाजी मोहंमद इब्राहिम मोहंमद यासीन यांचे निधन.

बोलून बातमी शोधा

mahapaur malegaon.jpg

हाजी मोहंमद इब्राहिम हे यासीनशेठ नँशनलवाले या व्यापारी परिवारातले. सन 2012 मधील मनपा सार्वत्रिक निवडणुकीत ते सर्वप्रथम विजयी झाले.  डिसेंबर 2014 ते जुन 2017 या दरम्यान त्यांनी शहराचे महापौरपद भुषविले होते. 2017 च्या निवडणुकीत मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

मालेगावचे माजी महापौर हाजी मोहंमद इब्राहिम मोहंमद यासीन यांचे निधन.
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : येथील महानगरपालिकेचे माजी महापौर हाजी मोहंमद इब्राहिम मोहंमद यासीन उर्फ नॅशनलवाले (वय 62) यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पच्यात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंखांक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी मोहंमद युसुफ यांचे ते मोठे बंधू होते.  

श्वसनाचा त्रास जाणवू लागला.

हाजी मोहंमद इब्राहिम हे यासीनशेठ नँशनलवाले या व्यापारी परिवारातले. सन 2012 मधील मनपा सार्वत्रिक निवडणुकीत ते सर्वप्रथम विजयी झाले.  डिसेंबर 2014 ते जुन 2017 या दरम्यान त्यांनी शहराचे महापौरपद भुषविले होते. 2017 च्या निवडणुकीत मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता. शहरात कोरोना संसर्ग वाढल्या नंतर ते सातत्याने जनजागृती करीत होते. नॅशनलवाले कुटंबीयांतर्फे तर्फे गरिबांना जीवनावश्यक वस्तू व मदतीचे वाटपही होत होते. गुरूवारी रात्री उशिरा अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले त्यातच त्यांना श्वसनाचा त्रासही जाणवू लागला. कुटुंबियांनी त्यांना तातडीने सहारा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरु असतानाच शुक्रवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! "करपलेल्या जखमी पायांनी लांब अंतर कापतोय खरं..पण घरात घेतील ना?"

हेही वाचा > नियती झाली क्रूर! आई..'सगळं सुख तुझ्या पायाशी आणेल मी"...म्हणणारा मुलगा तिच्यासमोर प्राण सोडतो तेव्हा