
उत्तर महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणखी एक धक्का बसणार आहे. धुळे आणि नाशिकमधील दोन माजी आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आलीय. धुळ्याचे माजी काँग्रेस आमदार कुणाल पाटील आणि नाशिकचे माजी आमदार अपूर्व हिरे हे दोघेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. १ जुलै रोजी दोघांचा पक्ष प्रवेश होणार आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या पदग्रहण कार्यक्रमातच हा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर नेते उपस्थित असतील.