Latest Marathi News | श्राद्धविधीच्या ठिकाणी वाहतेय दुर्गंधीयुक्त सांडपाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sewage flowing from the place of Shraddha Vidhi

Nashik : श्राद्धविधीच्या ठिकाणी वाहतेय दुर्गंधीयुक्त सांडपाणी

पंचवटी (जि. नाशिक) : श्राद्धविधी ठिकाणीच चेंबरच्या ढाप्यातून दुर्गंधीयुक्त सांडपाणी वाहत असल्याचे चित्र रोज दिसत आहे. स्मार्टसिटीअंतर्गत करण्यात आलेल्या मलजलवाहिनीच्या कामानंतरही समस्या निर्माण झाली असून, तक्रार करूनही ही समस्या सुटली नसल्याने पुरोहितांसह भाविकांची डोकेदुखी वाढली आहे. (Foul smelling sewage flows at place of Shraddha at Panchavati Nashik Latest Marathi News)

रामकुंडाच्या वाहनतळाकडे जाणाऱ्या मार्गावर स्मार्टसिटीअंतर्गत मलजलवाहिनीचे कामे नव्याने करण्यात आलेले आहे. या वाहिनीच्या चेंबरवरील ढाप्यातून सकाळी सहा ते साडेदहाच्या सुमारापर्यंत सांडपाणी वाहते. ते पाणी नेमक्या पूजेच्या ठिकाणावरून वाहत येथील लक्ष्मणकुंड व धनुष्य कुंडात जाऊन ते पुढे रामकुंडात जाते.

पवित्र रामकुंडात अशा प्रकारे पाण्याचे प्रदूषण होत असते. भाविक मोठ्या श्रद्धेने रामकुंडातील पाण्यात स्नान करतात. येथील पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात. त्यात अशा प्रकारे मलजल मिसळत आहे. रामकुंडाच्या वाहनतळाकडे जाणाऱ्याच्या मार्गाच्या दक्षिणेला येथील पुरोहित गेली अनेक पिढ्यांपासून रोज विधी करीत असतात.

हेही वाचा: Nandurbar : अष्टविनायक यात्रा बससेवा आता 20 सप्टेंबरला

त्यांच्या या विधीच्या जागाही ठरलेल्या आहेत. त्या जागेवरच सांडपाणी येत असल्याने विधी नेमके कुठे करायचे, हा प्रश्न त्यांना पडला आहे. ढाप्यातून बाहेर पडणारे पाणी दुपारी बंद होत असले तरी साठणाऱ्या सांडपाण्याच्या गाळाच थर या भागात साचतो. या साचलेल्या थराची दुर्गंधी असह्य करणारी आहे. या भागात अनेक छोटे व्यावसायिक भाविकांच्या गरजेच्या वस्तूंच्या विक्री करतात. त्यांच्या जागेवरही सांडपाणी येत असल्याने त्यांनाही या त्रासाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

"जगभरातून रामकुंड परिसरात विधी करण्यासाठी भाविक येतात. सकाळी पार पडत असलेल्या विधीच्या वेळेतच मलजलवाहिनीतून सांडपाणी विधीच्या ठिकाणाहून वाहते. दुर्गंधीमुळे त्रस्त होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही ही समस्या सुटली नाही."

- चंद्रशेखर पंचाक्षरी, पुरोहित संघ

हेही वाचा: Nashik : लंपीचा धसका पितृपक्षावरही; पितरांचा घास घालायला मिळेना गो- माता

Web Title: Foul Smelling Sewage Flows At Place Of Shraddha At Panchavati Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikfuneral