esakal | वन्यप्राण्यांच्या शिकारीचा प्लॅन फिस्कटला! पोलीसांनी केला पर्दाफाश
sakal

बोलून बातमी शोधा

forest

वन्यप्राण्यांच्या शिकारीचा प्लॅन फिस्कटला! पोलीसांनी केला पर्दाफाश

sakal_logo
By
कुणाल संत

नाशिक : वन विभागाच्या (forest department) हद्दीतील अंजनेरी राखीव वनक्षेत्रात विनापरवानगी वाघरू (सापळा) लावून वन्यप्राण्यांची शिकार (wild animal hunting) करण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. या चौघांना न्यायालयाने शनिवार (ता. २९)पर्यंत वन कोठडी सुनावली. (Four-arrested-for-Hunting-nashik-marathi-news)

वन विभागाची अंजनेरीत कारवाई

अंजनेरी नियत क्षेत्रातील मौजे तळवाडे येथील कम्पा क्रमांक ५०० मध्ये राखीव वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रात मंगळवारी (ता. २५) रात्री संशयित विठ्ठल मंगळू भुरमुडे (वय ३४), रामा गणपत लोथे (४८), रामदास गोविंद सराईत (४५, सर्व रा. अंधारवाडी, बेझे), सोमो भिवा पारधी (४५, रा. मौजे तळेगाव- काचुर्ली) यांनी विनापरवानगी प्रवेश करून या ठिकाणी वन्यप्राण्याच्या शिकारीसाठी वाघरू (सापळा) लावले. याबाबत माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. तेथे त्यांनी संशयित भुरमुडे, लोथे, सराईत व पारधी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून शिकारीसाठी आणलेली हत्यारे, भाला, कोयता तसेच वेळूच्या काठ्या आणि दुचाकी (एमएच १५, एचके ५०६७) असे साहित्य जप्त केले.

हेही वाचा: काळाचा घाला! महिन्याभरातच कुटुंबाची एकत्रच निघाली अंत्ययात्रा

शनिवारपर्यंत वन कोठडी

या चौघांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सर्व संशयितांना बुधवारी (ता. २६) न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने संशयितांना चार दिवसांची वन कोठडी सुनावली. उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक गणेश झोळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वनपाल सुजित बोकडे, अनिल अहिरराव, वनरक्षक ज्ञानेश्वर शिंदे, सचिन आहेर, संतोष चव्हाण आदी तपास करीत आहेत.

हेही वाचा: कपडे काढो आंदोलन : जितेंद्र भावेंसह समर्थकांवर गुन्हे दाखल