Nashik Crime : किरण निकम खूनप्रकरणी चौघांना जन्मठेप; लाड प्राणघातक हल्ला प्रकरणी दोघांना जन्मठेप

Crime
Crimeesakal

Nashik Crime : पंचवटीतील टोळीयुद्धातून २०१७ मध्ये झालेल्या खुनाच्या प्रकरणात चौघांना, तर लाड यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यात दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवार (ता. ६) जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

यात गणेश उघडे, जितेश मुर्तडक, संतोष पगारे, संतोष उघडे, शेखर निकम व केतन निकम या आरोपींचा समावेश आहे. (Four life imprisonment in Kiran Nikam murder case Life imprisonment for two in Lad assault case Nashik Crime news)

पंचवटीतील २०१७ मधील खुनांच्या खटल्याचे निकाल दिले. यात न्यायाधीश वर्धन देसाई यांच्या न्यायालयाने किरण राहुल निकम खून खटल्यात गणेश अशोक उघडे, जितेश ऊर्फ बंडू संपत मुर्तडक, संतोष विजय पगारे, संतोष अशोक उघडे या चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

तर न्यायाधीश आदिती कदम यांच्या न्यायालयाने डाळिंब व्यापारी संदीप लाड यांच्यावरील गोळीबार करून प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात शेखर राहुल निकम व केतन राहुल निकम यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

२०१७ मध्ये वर्चस्ववादातून टोळीयुद्ध भडकल्याने दोन्ही गटाकडून एकमेकावर दहशत निर्माण करून परिसरात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी परस्पर विरोधी हल्ले केले होते. यात १८ मे २०१८ ला रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास नवनाथनगर पंचवटी येथे सावळे यांच्या घरासमोरून किरण राहुल निकम हा दुचाकीवरून जात असताना गणेश उघडे,

जितेश मुर्तडक, संतोष पगारे व संतोष उघडे यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी भांडणाची कुरापत काढत धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण खून केला होता. या हल्ल्यात सर्व हल्लेखोरांनी मिळून किरण निकम याच्यावर सुमारे १०१ वार केले होते.

याप्रकरणात तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक के. डी. वाघ यांनी आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात १६ साक्षीदार तपासल्यानंतर न्यायालयाने निकाल दिला. गणेश उघडे, जितेश मुर्तडक, संतोष पगारे व संतोष उघडे यांना जन्मठेपेसह दहा हजार रुपयांची शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Crime
Crime News : नाचताना धक्का लागल्याने तरुणास भोसकले

तर किरण निकमच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तसेच मार्केट यार्ड भागात हप्ता वसुलीसाठी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने शेखर निकम व केतन निकम यांनी २९ जून २०१७ ला दुपारी पावणेतीनच्या सुमारास पेठ रोडवरील बच्छाव हॉस्पिटलच्या बाजूला चहा पीत असलेल्या संदीप लाड याच्यावर गोळ्या झाडून प्राणघातक हल्ला केला होता.

या हल्ल्यात संदीप लाड यांच्या छातीत गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणात २३ साक्षीदारांच्या साक्ष तपासल्यानंतर न्यायाधीश आदिती कदम यांच्या न्यायालयाने शेखर निकम व केतन निकम यांना जन्मठेप दहा हजार रुपयांची शिक्षा सुनावली आहे.

दरम्यान, किरण निकम याच्या खुनाच्या बदला घेण्याच्या प्रयत्नात उपनगर परिसरातही एकाची हत्या करण्यासह अन्य खटलेही निकम बंधूंवर असल्याने त्यांच्यावर मोकांतर्गतही कारवाई करण्यात आली होती. परंतु, मोकांतर्गत व अन्य कलमाद्वारे ठेवण्यात आलेल्या आरोपांतून न्यायालयाने आरोपींना दोषमुक्त केले आहे.

Crime
Solapur Crime : आईकडील पैशाच्या वाटणीवरुन जोरदार हाणामारी; पाठीत घातला दगड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com