Nashik News: मित्राच्या मृत्यूनंतरही निभावली मैत्री! शर्मा कुटुंबासाठी सरसावला मालेगावचा ‘जिगरी दोस्त'

Friends from 'Jigari Dost' group console the family paying tribute to Yogesh Sharma.
Friends from 'Jigari Dost' group console the family paying tribute to Yogesh Sharma.esakal

Nashik News: मित्राच्या मृत्यूनंतर शर्मा कुटुंबासाठी येथील के. बी. एच. विद्यालयातील १९९२ च्या ‘बॅच'च्या ‘जिगरी दोस्त' समूह सरसावला. मित्राच्या दोन मुलींच्या शिक्षणासाठी समूहातील मित्रांनी लाखाची मदत देत कुटुंबीयांचे सांत्वन केले. (Friends of group help for education of two daughters of dead friend nashik news)

सोशल मीडियाने दूरवरील मित्रांना एकत्रित आणले. अलीकडे मैत्रीचा धागा त्याद्वारे घट्ट होत स्नेहमेळाव्यातून जोपासना झाली. रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीचे नाते अनेकदा निःस्वार्थी भावनेने सुख-दुःखात धावून येते.

त्याची प्रचिती ‘जिगरी दोस्त' समूहाच्या सांत्वनातून आली. मित्राच्या कुटुंबीयांना मदत देत ‘दोस्ती का नाम जिंदगी'चा संदेश दिला आहे. ‘जिगरी दोस्त' मित्र परिवारातील योगेश शर्मा यांचे नुकतेच अल्प आजाराने निधन झाले. बालवयात पितृछत्र हरविलेल्या योगेशचा मृत्यू शर्मा कुटुंबासाठी धक्कादायक होता.

स्वतःच्या पायावर उभा राहून शिक्षण घेऊन मसाले कंपनीच्या माध्यमातून आपला संसार व्यवस्थित सावरलेला असतानाच काळाने घाला घातला.

Friends from 'Jigari Dost' group console the family paying tribute to Yogesh Sharma.
Nashik Water Cut: 21 दिवसांच्या पाणीकपातीचे आव्हान; प्रशासनासमोर पेच

अशा परिस्थितीत मित्राच्या जाण्याने पोरके झालेल्या मित्रांनी दुःखाला कुरवाळत बसण्यापेक्षा योगेश यांच्या दोन मुलींचे शिक्षणासह अनेक भविष्यातील अडचणी पाहून एक लाखांची मदत जमा केली. शर्मा यांच्या लहान मुलींच्या नावाने कायम मुदत ठेव ठेवत मैत्रीचा आदर्श समाजासमोर ठेवला.

ठेवीचे प्रमाणपत्र शर्मा यांच्या कुटुंबीयांना देत भविष्यात आधार म्हणून सर्वांसोबत असल्याचे सांगितले. यावेळी ‘जिगरी दोस्त' समूहातील नंदुरबारचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, डॉ. नरेंद्र डोखे, संदीप भुसे, योगेश बागूल, श्रीराम अहिरे, राकेश पवार, गणेश महाले, किरण पगार,मंगेश सूर्यवंशी, प्रा. महेश बागड, सुनील पवार आदी उपस्थित होते.

Friends from 'Jigari Dost' group console the family paying tribute to Yogesh Sharma.
Tribal Dept Furniture Scam: आदिवासी विभागातील फर्निचर खरेदीत 62 कोटींचा घपला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com