Jai Jai Maharashtra Majha : 19 फेब्रुवारीपासून राज्यात राज्यगीत 'जय जय महाराष्ट्र माझा..' गायलं जाणार...!

Jai Jai Maharashtra Majha
Jai Jai Maharashtra Majhaesakal

वणी (जि. नाशिक) : देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य वर्षात देशातील प्रत्येक राज्याचं स्वतःचं राज्यगीत असावं असं ठरवण्यात आलं होतं. त्यानुसार शाहीर साबळे यांच्या बुलंद आवाजातील 'जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा' या गाण्याला महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृतीचं दर्शन या गाण्यातून होतं. येत्या १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

दरम्यान जय जय महाराष्ट्र माझा या गाण्यातील केवळ दुसरं आणि तिसरं कडवंच राज्यगीतात गायलं जाणार आहे. वेळेचा विचार करता गीत मोठं होत असल्यानं निर्णय घेण्यात आला आहे. एक मिनिट ४५ सेकंदाचे हे राज्य गीत असणार आहेत. (From February 19 national anthem jai Jai Maharashtra Majha will sung in state maharashtra News)

Jai Jai Maharashtra Majha
Maharashtra Budget: अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा पहिलाच अर्थसंकल्प; जनतेतून मागवल्या सूचना

“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" चे औचित्य साधून राज्यातील तरुणाई तसेच समाजातील सर्वच नागरीकांना स्फुर्तीदायक असणारे तसेच महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करणारे अस्मितादर्शक असे राज्याचे अधिकृत राज्यगीत असावे, ही बाब शासनाच्या विचाराधीन होती.

त्यानुषंगाने, कवीवर्य श्री राजा नीळकंठ बढे लिखित "जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे स्फुर्तीदायक गीत "राज्यगीत" म्हणून शासनाने स्विकारत याबाबतच अद्यादेश निर्गमीत करण्यात आला आहे. संपूर्ण गीत हे अत्यंत आशयपूर्ण स्फुर्तीदायक आणि राज्याच्या थोर आणि शूर परंपराची गाथा सांगणारे असले तरी राज्यगीत हे विविध प्रसंगी सातत्याने सादर होणे अपेक्षित आहे.

त्यामुळे, वेळ मर्यादेचे भान ठेऊन त्याचे संक्षिप्तीकरण होणे आवश्यक ठरते. सध्या प्रचलित असलेल्या सदर गीतातील २ चरणे मिळून त्यांचे नव्याने ध्वनीमुद्रण करुन ते मर्यादित वेळेत म्हणजेच दीड ते पावणे दोन मिनिटात बसविण्याचा शासनाचा मानस आहे.

त्यानुसार कवीवर्य राजा बढे लिखित व शाहीर साबळे यांनी गायलेल्या गीतावर यथोचित संस्करण करुन दोन चरणांसह राज्यगीत शासनाने स्वीकृत केले आहे. राज्यगीत गायन/वादन यासंदर्भातील औचित्याचे पालन करण्यासाठी विविध मार्गदर्शक सूचनांचे अनुपालन करावे लागणार आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Jai Jai Maharashtra Majha
Maharashtra MLC Election : BMC निवडणुकपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळाले शुभसंकेत

शासकीय कार्यालये/ निम शासकीय कार्यालये, शासकीय अनुदानित व विना अनुदानित आस्थापना, स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठे, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत उपक्रम, स्वयंसेवी संस्था व खाजगी आस्थापना तसेच सर्व नागरीकांना राज्यगीताच्या सन्मानपूर्वक गायन वादनामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन शासन निर्णयाद्वारे करण्यात आले आहे..

असे असेल राज्यगीत.....

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥ १ ॥

दारिद्र्याच्या उन्हात शिजला

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी

पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी

निढळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी

झिजला दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा ॥ २ ॥

Jai Jai Maharashtra Majha
Maharashtra Budget 2023: 'तुमच्या संकल्पनेतील महाबजेट'; फडणवीसांची जनतेकडून मागवल्या आयडिया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com