esakal | वीर जवान सचिन चिकणे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
sakal

बोलून बातमी शोधा

funeral of jawan sachin chikane in a state funeral

वीर जवान सचिन चिकणे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

sakal_logo
By
पोपट गवांदे

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान यांचे सोमवारी (ता.३०) कर्तव्यावर असताना निधन झाले. जवान सचिन चिकणे यांच्या पार्थिवावर बुधवारी (ता.१) अंत्यसंस्कार करण्यात आले.


दुपारी त्यांच्या मूळगावी इगतपुरी येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्वांत आधी वीर जवान सचिन चिकणे यांच्या पार्थिवास केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण केले. आमदार हिरामण खोसकर, प्रांत तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासुळे, पोलिस उपअधीक्षक अर्जुन भोसले, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे रमेश वर्मा, निरीक्षक समाधान नागरे, नवनियुक्त निरीक्षक वसंत पथवे, उपनिरीक्षक दीपक पाटील, अनिकेत कुलकर्णी, नगराध्यक्ष संजय इंदुलकर, मुख्याधिकारी पंकज गोसावी, मंडलाधिकारी नानासाहेब बनसोडे, लान्सनायक विजय कातोरे यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. तत्पूर्वी दुपारी साडेतीनला सचिन यांचे पार्थिव घरी आणण्यात आले होते. कुटुंबीय आणि नातेवाइकांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेच्या पुढे तरुण तिरंगा धरून चालत होते. सह्याद्रीनगर व परिसरातून अंत्ययात्रा इगतपुरी शहरातील हुतात्मा स्मारकाजवळ आली असता नागरिकांनी ‘वीर जवान सचिन चिकणे अमर रहे’च्या घोषणा दिल्या. अंत्ययात्रा इगतपुरी येथील अमरधाम येथे पोचली. त्यानंतर पोलिस दल व केंद्रीय राखीव पोलिस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. त्यांचे मोठे बंधू सचिन चिकणे यांनी अग्नी दिला. वीर जवान सुनील चिकणे यांच्यामागे आई, पत्नी, दोन मुली, बहीण, दोन भाऊ, असा परिवार आहे. या वेळी नातेवाईक व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यात जिल्‍ह्यात १० दिवसांनंतर शंभरहून अधिक बाधित

हेही वाचा: 'गवळींनी ट्रस्टची ७० कोटींची संंपत्ती पीएच्या नावावर केली'

loading image
go to top