esakal | 'नेल्सन मंडेला ते बराक ओबामा यांचेही गांधीजी हेच प्रेरणास्थान' - छगन भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan bhujbal 2 oct.jpg

महात्मा गांधी यांच्याकडून अनेकांनी प्रेरणा घेतली. नेल्सन मंडेलांपासून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचेही गांधीजी हेच प्रेरणास्थान आहेत. गांधीजींनी आयुष्यात अनेक विषयांवर आपले विचार मांडले. हेच गांधीजींचे विचार त्यांची वचने म्हणून प्रसिद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

'नेल्सन मंडेला ते बराक ओबामा यांचेही गांधीजी हेच प्रेरणास्थान' - छगन भुजबळ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ वी जयंती व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथील कार्यालयात पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

त्यांनी स्वातंत्र्यलढा नैतिकतेने लढला...

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढा नैतिकतेने लढला. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजीनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यानी संपूर्ण जगाला प्रेरित केले. महात्मा गांधी यांच्याकडून अनेकांनी प्रेरणा घेतली. नेल्सन मंडेलांपासून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचेही गांधीजी हेच प्रेरणास्थान आहेत. गांधीजींनी आयुष्यात अनेक विषयांवर आपले विचार मांडले. हेच गांधीजींचे विचार त्यांची वचने म्हणून प्रसिद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

महात्मा गांधी हे सदाचाराचे ते मूर्तीमंत स्वरूप...

त्याचबरोबर स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री एवढ्या उच्च पदावर असतांनाही त्यांच्यामध्ये सत्य, निर्मळपणा, प्रामाणिकपणा, साहस, साधेपणा, देशप्रेम इत्यादी सद्गुण होते आणि सदाचाराचे ते मूर्तीमंत स्वरूप होते. असे महापुरुष अल्पकाळ राज्य करूनसुद्धा जनसामान्यांवर आपला प्रभाव सोडून गेले असे सांगत त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन केले.

हेही वाचा > पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैधरित्या वाहतूक; औरंगाबाद-अहवा महामार्गावरील धक्कादायक प्रकार

यावेळी ॲड. रवींद्र पगार,  रंजन ठाकरे,दिलीप खैरे, महिला अनिता भामरे, नाशिक महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, मुख्तार शेख, सरचिटणीस संजय खैरनार, महेश भामरे, भगवान थोरात, ॲड.चिन्मय गाढे, उदय सराफ, भालचंद्र भुजबळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा > माजी सरपंचाच्या पुतण्याचा खून; नदीपलीकडे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ