esakal | गणेशोत्सव 2021 : बाप्पाच्या सजावटीसाठी ग्राहकांचा स्वदेशीचा नारा
sakal

बोलून बातमी शोधा

citizens tend to buy indigenous items for ganpati decoration

गणेशोत्सव 2021 : बाप्पाच्या सजावटीसाठी ग्राहकांचा स्वदेशीचा नारा

sakal_logo
By
तुषार महाले


नाशिक :
गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपल्याने घरातील गणपती सजावटीसाठी ग्राहकांचा स्वदेशी वस्तू घेण्याकडे कल आहे. गणपतीची छत्री, सिंहासन, सोनेरी- चांदीचे पाट, चौरंग, नैवेद्य ठेवण्यासाठी बास्केट आदी वस्तूंना सर्वाधिक मागणी असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.


चिनी बनावटीचे सजावटीसाठी लागणारे साहित्य स्वस्त दरात उपलब्ध होत असल्यामुळे अशा वस्तूंकडे ग्राहकांचा कल जास्त होता. दोन वर्षाआधी भारतीय सणांना चिनी वस्तूंच्या सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ व्यापून जात असे परंतु, गतवर्षापासून स्वदेशी बनावटीच्या वस्तूंना सर्वाधिक मागणी असल्याचे बाजारपेठेत चित्र आहे. सजावटीसाठी लागणारे सर्वच साहित्य भारतीय बनावटीचे असल्याचे बाजारपेठेत दिसत असून, ग्राहकही भारतीय वस्तूंनाच प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. स्वदेशी वस्तूंमध्येही ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध झाले आहे. बाजारात प्लॅस्टिकसह कापडी आर्टिफिशिअल फुले व्रिकीसाठी आहे. यात सर्वाधिक मागणी कापडी फुलांना असून, गणपतीसाठी लागणारे आकर्षक आर्टिफिशिअल हार, कुंदन, ढोल वादक मुषक यांनाही मागणी असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. व्यावसायिकही स्वदेशी बनावटीच्या वस्तू विक्रीसाठी ठेवत आहे. गतवर्षी कोरोनाच्या भीतीमुळे, संभ्रमामुळे सजावटीच्या वस्तूंना मागणी नव्हती. यावर्षी विक्रेत्यांनी सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंची दुकाने थाटली असून, ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा: २७ हजारांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षकासह दोघांना अटक


गणेशचतुर्थी आठ दिवसांवर आली असून, गणपती घरातील सजावटीसाठी गणपतीची छत्री, सिंहासन, सोनेरी चांदीचे पाट, चौरंग, नैवेद्य ठेवण्यासाठी बास्केट आदी वस्तूंना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- दिनेश शिंदे , व्यावसायिक

हेही वाचा: नाशिक : तरुणाच्या खून प्रकरणी चार अल्पवयीन संशयित ताब्यात

loading image
go to top