Ganeshotsav 2022 : घरगुती तयार देखाव्यास मागणी | latest marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

An attractive throne made of foam

Ganeshotsav 2022 : घरगुती तयार देखाव्यास मागणी

जुने नाशिक : बाप्पाच्या स्थापनेसाठी आकर्षक घरगुती देखाव्यांना नागरिकांकडून विशेष मागणी आहे. विशेषतः विविध आकारातील सिंहासन आणि मंदिरांची प्रतिकृतींचा समावेश आहे. अशा प्रकारच्या सिंहासन आणि मंदिराच्या प्रतिकृतींना बाजारपेठ सजली आहे. विशेष म्हणजे प्लॅस्टिक, थर्मोकोलचा पर्याय म्हणून फोम आणि कार्डबोर्ड, प्लायवूड ने तयार केलेले सिंहासन, मंदिरे बाजारात विक्रीस दाखल झाले आहे. (Ganeshotsav 2022 Demand for Home Ready made Decorations Nashik Latest Marathi News)

यंदा प्रशासनाकडून प्लॅस्टिक आणि थर्माकोल वापरावर बंदी घातली आहे. विक्रेत्यांनादेखील सूचना देण्यात आले आहे. त्यांच्याकडे थर्मोकोलच्या वस्तू आढळल्यास कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानिमित्ताने यंदा प्लॅस्टिक आणि थर्माकोलला पर्याय म्हणून कार्डबोर्ड (पुट्टा), रबर शीट, प्लायवूड, फोम यांच्यापासून तयार केलेले.

तसेच रत्न, जाळीची ओढणी, मखमली कापड, कागद यांच्यापासून सजावट केलेले आकर्षक सिंहासन, मंदिर बाजाराची शोभा वाढवत आहे. विशेष म्हणजे नागरिकांकडूनदेखील त्याला पसंती मिळत आहे. थर्माकोलच्या तुलनेत अशा प्रकारचे सिंहासन, मंदिराचे दर काहीअंशी जास्त आहे. त्यातल्या त्यात इतर वस्तूच्या तुलनेत फोम काहीसे स्वस्त आहे.

त्यामुळे सिंहासन, मंदिर यास विविध प्रकारची आरास उभारणीसाठी नागरिकांकडून फोमचा सर्वाधिक वापर केला जात आहे. फोमपासून तयार केलेल्या वस्तूंना अधिक मागणी आहे. फोमपासून तयार केलेले मंदिराचे पिल्लर, भिंती, फोम शीट यांची अधिक विक्री होत आहे. त्याचप्रमाणे लाकूड आणि आर्टिफिशियल पानांपासून तयार केलेली जाळी, गालिचा यांनादेखील पसंती मिळत आहे.

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : बाप्पाच्या आगमनासाठी प्रशासकीय यंत्रणा सरसावली

एक फुटापासून ते तीन फुटापर्यंत सिंहासन बाजारात उपलब्ध आहे. जय मल्हार, राज सिंहासन, मोर सिंहासन, लायटिंग सिंहासन, राजमुद्रा सिंहासन, डिझायनेबल सिंहासन, असे सिंहासनाचे प्रकार बाजारात उपलब्ध आहे.

असे आहे दर

प्रकार दर
सिंहासन, मंदिर २५० ते ४ हजार
जाळी ५०० ते ६००
आर्टिफिशिअल वेल ४० ते ५० रुपये
फोम पिलर ४० ते १००
फोम मोर जोडी १२०
फोम शीट ३० ते ४००

"थर्माकोलला पर्याय म्हणून बाजारात विक्रीस आलेले कार्डबोर्ड, फोम, रबर शीट, प्लायवूड सिंहासन आणि मंदिरास ग्राहकांची पसंती मिळत आहे. दरांमध्ये २० ते ३० टक्के वाढ झाली आहे. "- राजेंद्र जैन, व्यावसायिक

हेही वाचा: गणेशोत्सवासाठी NMC ॲक्शन मोडवर; आयुक्तांकडून मिरवणूक मार्गाची पाहणी

Web Title: Ganeshotsav 2022 Demand For Home Ready Made Decorations Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..