Latest Marathi News | Ganeshotsav 2022 : पेशव्यांच्या आराध्य दैवताच्या महतीची माहिती गणेशपुराणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakalche Bappa Ganeshotsav 2022 News

Ganeshotsav 2022 : पेशव्यांच्या आराध्य दैवताच्या महतीची माहिती गणेशपुराणात

नाशिक : नाशिक अन् पेशवे असा स्नेहबंध राहिल्याचे दाखले इतिहासात मिळतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पेशव्यांचे आराध्य दैवत गणपती हे आपणाला जाणून घ्यायला हवे. धर्मशास्त्राचे अभ्यासक नरेंद्र धारणे यांच्याकडून यासंबंधीचा संदर्भ जाणून घेण्यात आला असता, त्यांनी गणेशपुराणाचा दाखला दिला.

यात श्रीगणेशाला शक्ती, बुद्धी, समृद्धी-संपत्तीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे स्वाभाविकपणे आपला राजकारभार चांगला चालावा म्हणून पेशव्यांकडून गणेशभक्तीला स्थान मिळाल्याचे श्री. धारणे यांनी सांगितले. (Ganeshotsav 2022 importance of Peshwa adorable deity in Ganesha Purana Latest Marathi News)

श्री. धारणे म्हणाले, की भगवान विष्णू आणि महालक्ष्मी यांच्यात संवाद सुरु होता. तेंव्हा भगवानांनी संततीच्या कमतरतेच्या मांडलेल्या मुद्याबद्दल महालक्ष्मी यांनी आपली मैत्रीण पार्वती देवी यांना विचारला. पार्वती यांनी आपला मुलगी गणपतीला दत्तक देण्यातून पुत्राची परिपूर्ती होईल, असे सांगितले.

त्यातून गणपती तिथे लक्ष्मीची प्रसन्नता असा भाव तयार झाला आहे. कथेतील हा भाग पाहिल्यावर आपल्याला प्रजेचे संरक्षण आणि राज्य विस्तारासाठीची शक्तीदेवता गणपती असे दिसते. शिवाय गणपती पूजन आणि सेवाभावामुळे संपत्तीचे समाधान मिळते. बुद्धीची उत्तम आराधना होते. शिवाय गणेशोत्सवातील गौरी-गणपती हा उत्सव कुटुंबांमधून होत असतो.

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : पुरोगामी चळवळीचा आदर्श कायम

गौरीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. म्हणजेच, उत्सवी वातावरणातून कुटुंबामध्ये समृद्धी, संपत्ती नांदते असा भाव भक्तजणांमध्ये असतो. एकुणात काय, तर वेदकालीन देवता असलेल्या गणपतीला आराध्य दैवत म्हणून स्थान दिलेल्या पेशव्यांना आपला वर्षानुवर्षे राजकारभार करता आला आहे, असे म्हणता येईल.

नवशा गणपती श्रद्धास्थान

गोदावरीच्या तिरावरील पूर्वाभिमूख असलेले नवशा गणपती मंदिर हे पेशवेकालीन साथ देते. राघोबादादा आणि आनंदीबाई यांनी मंदिराची स्थापना १७७४ मध्ये केली. पेशव्याचे श्रद्धास्थान गणपती असल्याने या दाम्पत्याने १७६४ मध्ये झालेल्या अपत्याचे नाव विनायक ठेवले होते.

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : लहानग्याच्या शिल्पकलेवर आनंद महिंद्रा फिदा

Web Title: Ganeshotsav 2022 Importance Of Peshwa Adorable Deity In Ganesha Purana Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..