Ganeshotsav 2022 : लहानग्याच्या शिल्पकलेवर आनंद महिंद्रा फिदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav 2022

Ganeshotsav 2022 : लहानग्याच्या शिल्पकलेवर आनंद महिंद्रा फिदा

कोविडच्या दोन वर्षानंतर यंदा गणेशोत्सवाचा उत्साहत वेगळा आहे. त्याबरेबरच यंदा इकोफ्रेंडली गणेशमूर्तीलाही प्रोत्साहन मिळाले आहे. त्यामुळे देशात विविध शहरांमध्ये कलाकार मोठ्या गणेशमूर्ती बनवताना दिसतात. अशातच उद्योगपती आनंद महिंद्रा गणपतीची मूर्ती बनवणाऱ्या मुलाची प्रतिभा पाहून अत्यंत प्रभावित झाले आहेत.

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : ...यामुळे पडले गणेशाला सिंदुरवदन हे नाव, जाणून घ्या कहाणी

आनंद महिंद्रा शेअर केला व्हिडिओ

हा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये एक मुलगा गणेशाची मूर्ती बनवताना दिसत आहे. हा मुलगा एखाद्या सराईत कलाकार किंवा व्यावसायिक शिल्पकारासारखा मूर्तीला आकार देताना दिसत आहे. ज्याचे टॅलेंट पाहून सगळेच त्याचे कौतुक करत आहेत.

हेही वाचा: Ganeshotsav 2022: गणेशोत्सवात तांबे पितळाची भांडी स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक

व्हिडीओमध्ये, लहान मुल गणेशाच्या अनेक मूर्तींमध्ये बसून एक मूर्ती बनवताना दिसत आहे. या दरम्यान, तो अत्यंत स्वच्छतेने मातीवर गणपतीची प्रतिमा कोरतो आणि त्याला मूर्तीचा आकार देतो. व्हायरल क्लिपमध्ये, मुलगा वेगाने गणपतीच्या सोंडेला आकार देत आहे. जे पाहून सगळेच थक्क झाले आहेत. अशा मुलांना कुठलं प्रशिक्षण मिळतं का, की भविष्यात त्यांना ही प्रतिभा सोडून द्यावी लागेल, असा सवाल आनंद महिंद्रा यांनी केला आहे.

हेही वाचा: Ganeshotsav: दक्षिण भारतीय पद्धतीने पोह्याचे मोदक कसे तयार करायचे?

सोशल मीडियावर व्हायरल

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ५ लाख ६९ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याच वेळी, ४७ हजारांहून अधिक लाईक्ससह ३ हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी ते रिट्विट केले आहे. युजर्सनी त्या मुलाच्या प्रचंड प्रतिभेचे कौतुक केले आहे.

Web Title: Ganeshotsav 2022 Anand Mahindra Tweet Boy Making Ganesh Murti

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..