Ganeshotsav 2023 : गणेशोत्सव मंडळांसाठी खुशखबर! राज्य शासनाकडून लाखोंची पारितोषिके जिंकण्याची संधी

Ganeshotsav 2023
Ganeshotsav 2023 esakal

Ganeshotsav 2023 : राज्यात १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना अनुक्रमे पाच, अडीच आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहेत. (Ganeshotsav 2023 Mandal chance to win lakh prizes by State Govt nashik news)

त्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी जिल्हा प्रशासनाला आज दिले. श्री. खारगे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून या कॉन्फरन्ससाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ उपस्थित होते.

२०२३ मध्ये राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. या पुरस्कारासाठीच्या २४ लाख ६० हजार रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

स्पर्धेत धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ganeshotsav 2023
YCMOU News : मुक्‍त विद्यापीठात शिक्षण अवघ्या 'इतक्या' रुपयांत! विद्यार्थ्यांना शुल्‍कात सवलतीची संधी

स्पर्धेसाठी पर्यावरणपूरक मूर्तीसाठी दहा गुण, पर्यावरणपूरक सजावट (थर्मोकोल, प्लॅस्टिकविरहित) १५ गुण, ध्वनिप्रदूषण विरहित वातावरणासाठी पाच गुण, ‘पाणी वाचवा, मुलगी वाचवा’, अंधश्रद्धा निर्मूलन आदी समाजप्रबोधन, सामाजिक सलोख्यासंदभार्तील सजावट, देखाव्यासाठी २० गुण, स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्ताने सजावट, देखाव्यासाठी २५ गुण असतील. गणेशोत्सव मंडळाने रक्तदान शिबिर आदी सामाजिक कार्यासाठी २० गुण अशा १५० गुणांची ही स्पर्धा असणार आहे.

...अशी असेल समिती

जिल्हास्तरावर उपजिल्हाधिकारीदर्जाचा अधिकारी या समितीचा अध्यक्ष असेल. समितीत शासकीय कला महाविद्यालयातील कला प्राध्यापक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी सदस्य असतील. जिल्हा नियोजन अधिकारी सदस्य सचिव असतील. निवड समिती प्रत्यक्ष उत्सवस्थळी भेट देतील, तसेच मंडळाकडून व्हिडिओग्राफी व कागदपत्र जमा करून घेतील. जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करण्यात येईल.

Ganeshotsav 2023
Ganeshotsav : पर्यावरणपूरक गणेश मूर्ती खरेदी करण्याचे महापालिकेचे आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com