Seized goods from truck
Seized goods from truckesakal

Nashik Crime: समृद्धीवर डिझेल चोरांची टोळी सक्रिय! खंबाळे शिवारात उभ्या वाहनांमधून डिझेलची चोरी; एकास पकडले, 3 फरार

पेट्रोल पंपाच्या आवारात विश्रांतीसाठी थांबलेल्या वाहनांमधील डिझेलची चोरी करत असताना पोलिसांनी छापा टाकला.

वावी : मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर डिझेल चोरांची टोळी सक्रिय झाली असून खंबाळे शिवारात असलेल्या पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळी पार्किंगमध्ये उभे असलेल्या वाहनांमधून डिझेल चोरीचा प्रकार वावी पोलिसांनी उघडकीस आणला.

पेट्रोल पंपाच्या आवारात विश्रांतीसाठी थांबलेल्या वाहनांमधील डिझेलची चोरी करत असताना पोलिसांनी छापा टाकला. मात्र यावेळी तिघे चोरटे समृद्धीच्या संरक्षक भिंतीवरून उड्या मारून पळून जाण्यात यशस्वी ठरले.

तर जखमी झालेल्या एकास पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत एका माल ट्रक सह इंधन चोरीसाठी वापरले जाणारे साहित्य व चोरलेल्या इंधनाचा पन्नास लिटर साठा जप्त करण्यात आला. (Gang of diesel thieves active on Samriddhi highway Theft of diesel from parked vehicles in Khambale area 1 caught 3 absconding Nashik Crime)

वावी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, हवालदार गोविंद सूर्यवाड, भास्कर जाधव, संदीप नागरे, तुषार दयाळ यांचे पथक मंगळवारी रात्र गस्तीवर होते खंबाळे शिवारातील समृद्धी महामार्गावर असलेल्या एकविरा पेट्रोलियम या एचपी कंपनीच्या पेट्रोल पंपावर बुधवारी पहाटेच्या वेळी पथक तपासणीसाठी पोहोचले.

यावेळी पार्किंग मध्ये उभे असलेल्या आठ ते दहा माल ट्रक च्या आडून होणाऱ्या संशयास्पद हालचाली पोलिसांनी हेरल्या. तीन ते चार जण पार्किंग मध्ये उभ्या ट्रकच्या डिझेल टाक्यांमधून इंधन चोरी करत असल्याचा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला.

मात्र पोलीस आपल्याकडे येत असल्याचे पाहून हे संशयित समृद्धी लगतच्या संरक्षक भिंतीकडे पळू लागले. पोलिसांनी काही अंतर त्यांचा पाठलाग केला. तिघेजण संरक्षक भिंतीवरून उड्या मारून पळून जाण्यात यशस्वी ठरले.

तर एक जण पळत असताना खाली पडल्यामुळे जखमी झाला होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. मनीष आमराम राठोड (45) राहणार उज्जैन असे ताब्यात घेतलेल्या संशयीताचे नाव आहे.

त्याच्याकडे विचारपूस केली असता एमपी 09 एचजी 15 55 या ट्रक मधून येऊन आम्ही महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनांमधील इंधन चोरी करत असल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून सदर ट्रक देखील ताब्यात घेतला.

Seized goods from truck
Nashik Crime: वऱ्हाणे शिवारात भेसळयुक्त पावणेचार कोटींची सुपारी जप्त! दिल्ली येथे नेत असताना अन्न व औषध प्रशासनाचा छापा

ट्रक मध्ये डिझेल साठवण्यासाठी बारा ते पंधरा 35 लिटर क्षमतेचे प्लास्टिक ड्रम आढळून आले. त्यापैकी दोन ड्रम मध्ये सुमारे 50 लिटर चोरी केलेले डिझेल देखील मिळाले. जखमी असलेल्या मनीष ला पोलिसांनी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

त्याचे विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या अन्य साथीदारांची नावे पोलिसांनी मिळवली आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर या प्रकरणी तपास करीत आहेत.

पोलिसांनी पकडलेल्या ट्रकमध्ये अनेक संशयास्पद वस्तू आढळून आल्या. ट्रकच्या केबिनमध्ये गोण्यांमध्ये दगड भरलेले होते. चोरी केलेले इंधन साठवलेल्या ड्रम मधून गळती होऊ नये म्हणुन झाकण सोबत लावण्यासाठी प्लास्टिकच्या कॅरीबॅग मिळाल्या.

चालक बाजू व क्लीनर बाजूच्या दरवाज्याजवळ मोठे दगड देखील ठेवलेले होते. मोठे दोर , लाकडी दांडे, लोखंडी सळया देखील केबिनमध्ये शिटांच्या खाली लपवून ठेवलेल्या होत्या. 18 टायर असलेल्या या ट्रकला डिझेलचे ड्रम आत मध्ये घेण्यासाठी चोर दरवाजा देखील बनवलेला होता.

प्लास्टिकचे ड्रम ठेवलेल्या ठिकाणी सर्वत्र ऑइल माखलेले होते. याचाच अर्थ मालवाहू ट्रक भासणाऱ्या या ट्रक मधून अनेक दिवसांपासून इंधन चोरीचा प्रकार करण्यात येत होता

Seized goods from truck
Nagpur Crime: बोलत नाही म्हणून संतापला तरुण; भररस्त्यात केली तरुणीला मारहाण, पोलिसांकडून आरोपीला अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com