Nashik Crime: बसस्थानकांवर चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय! 2 महिलांचे पावणेतीन लाखांचे दागिने लंपास

पोलिसात गुन्हे दाखल होतात परंतु ‘हितसंबंधा’मुळे चोरटे काही हाती लागत नसल्याचे बोलले जाते.
Crime News
Crime Newsesakal

नाशिक : शहरातील बसस्थानक हे चोरट्यांचे अड्डे बनू पाहत आहेत. अल्पवयीन मुले-मुली व महिलांच्या टोळ्या जुने सीबीएस आणि महामार्ग बसस्थानकात सक्रिय असून गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या मौल्यवान ऐवजावर डल्ला मारला जातो आहे.

पोलिसात गुन्हे दाखल होतात परंतु ‘हितसंबंधा’मुळे चोरटे काही हाती लागत नसल्याचे बोलले जाते. परंतु, प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे. (Gangs of thieves active at bus stop 2 women jewelry worth 3 lakhs stolen Nashik Crime)

सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुने मध्यवर्ती बसस्थानकात दोन प्रवासी महिलांच्या बॅगेतील पावणेतीन लाखांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत.

कल्याणी प्रदीप जोशी (रा. शिवूर, ता. वैजापूर, जि. संभाजीनगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्या रविवारी (ता. ११) बाहेरगावी जाण्यासाठी सीबीएस बसस्थानकात आल्या होत्या.

रात्री साडेआठच्या सुमारास त्या बसमध्ये चढत असताना, पर्समधील रोकडसह सोन्याची पट्टी पोत असा सुमारे एक लाख १० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

तर, दुसरी घटना सोमवारी (ता. १२) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. माधुरी संदीप क्षिरसागर (रा. तळेगाव दिघे ता.संगमनेर, जि. नगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्या बसमध्ये चढत असताना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी पर्सला ब्लेड मारून रोकडसह दागिणे व महत्त्वाची कागदपत्र असा सुमारे १ लाख ६३ हजाराचा ऐवज लांबविला.

दोन्ही घटनांप्रकरणी वेगवेगळे गुन्हे सरकारवाडा पोलिसात दाखल करण्यात आले असून अधिक तपास पोलिस नाईक लोंढे व जमादार उबाळे करीत आहेत.

Crime News
Solapur Crime : लॉजवर तरुणीचा विनयभंग; सोलापुरातील दोघांविरुद्ध गुन्हा

परजिल्ह्यातील टोळ्या

या घटनेमुळे बसस्थानकामध्ये चोरट्यांच्या टोळ्याच सक्रिय आहेत. गर्दीमध्ये महिलांच्या बॅगेतील पर्स, लहान मुलांच्या कानातील, गळ्यातील दागिने, महिला-पुरुषांच्या गळ्यातील सोन्याची चैन असा ऐवज चोरण्यात या टोळ्यांतील अल्पवयीन मुले-मुलींचा हातखंडा असतो.

बसस्थानक आवारात फिरणाऱ्या या टोळ्या मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली या परिसरातील असतात.

गस्तीपथकांचे हितसंबंध?

पोलिसांची गस्तीपथक सातत्याने बसस्थानकामध्ये गस्त करीत असतात. महामार्ग बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर मुंबई नाका पोलिस ठाणे आहे. तरीही त्या ठिकाणी प्रवाशांचे मौल्यवान वस्तू चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत.

चोरटेही पोलिसांच्या हाती लागत नसल्याने त्यांच्यात हितसंबंध असण्याची शक्यता व्यक्त होत असल्याचे बोलले जाते.

Crime News
Mahad Crime News : जमीन गैरव्यवहारप्रकरणी आणखी दोघांना अटक; आतापर्यंत पाच ताब्‍यात, कसून शोध सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com