esakal | इंदिरानगरमधील दांडियाची मैदाने यंदा सुनीसुनी; कोरोनामुळे तरुणाईच्या उत्साहावर विरजण 
sakal

बोलून बातमी शोधा

navratri dandiya

यंदा कोरोनामुळे दांडियाला बंदी असल्याने आनंद तरुणाईला अनुभवता येणार नाही. संयोजकांनाही चुकल्या चुकल्यासारखे वाटत असून, पुढील वर्षी सर्व सुरळीत होईल तेव्हा धमाकेदार आयोजन करू, असा विश्वास सर्व जण व्यक्त करत आहेत. 

इंदिरानगरमधील दांडियाची मैदाने यंदा सुनीसुनी; कोरोनामुळे तरुणाईच्या उत्साहावर विरजण 

sakal_logo
By
राजेंद्र बच्छाव

नाशिक/इंदिरानगर : दर वर्षी नवरात्रात लाखोंची बक्षिसे देणारी इंदिरानगर भागातील दांडियाची मैदाने यंदा कोरोनामुळे शांत राहणार असल्याने तरुणाईला चुकल्या चुकल्यासारखे वाटत आहेत. संपूर्ण शहराला दांडियाचे वेड लावणाऱ्या दांडिया मंडळांतर्फे दर वर्षी निशुल्क खेळण्याचा आनंद मिळवून दिला जातो.

राणेनगर येथील युनिक मैदानावर सभागृहनेते सतीश सोनवणे आणि डेअरी पॉवरचे दीपक आव्हाड फक्त महिलांसाठी दांडिया आयोजित करतात. सिने-नाट्य क्षेत्रांतील मंडळी हजेरी लावतात. दररोज मोठी बक्षिसे दिले जातात. या ठिकाणी होणाऱ्या तुफान गर्दीमुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचाही व्यवसाय तेजीत असतो. उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट जोडी, उत्कृष्ट ग्रुप, दांडिया किंग, दांडिया क्वीन अशा शेकडो बक्षिसांची यादीच या सर्वच मंडळांत असते. त्यामुळे शहराच्या प्रत्येक भागातून मोठ्या संख्येने युवक आणि युवती येथे हजेरी लावतात. यंदा मात्र कोरोनामुळे दांडियाला बंदी असल्याने ही सर्व मजा तरुणाईला अनुभवता येणार नाही. संयोजकांनाही चुकल्या चुकल्यासारखे वाटत असून, पुढील वर्षी सर्व सुरळीत होईल तेव्हा धमाकेदार आयोजन करू, असा विश्वास सर्व जण व्यक्त करत आहेत. 

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात

...या मंडळांकडून दर वर्षी नियोजन 

चेतनानगर येथे नगरसेविका पुष्पा आव्हाड यांचे बाजीराव फाउंडेशन, वासननगर येथे अजय दहिया आणि कमल अग्रवाल यांचे स्वामी समर्थ मित्रमंडळ, समर्थनगर येथील युवा सेनेचे बाळकृष्ण शिरसाठ यांचे राजमुद्रा वेलफेअर फाउंडेशन, माजी नगरसेवक अमोल जाधव यांचे सह्याद्री युवक मंडळ, इंदिरानगरमध्ये नगरसेविका सुप्रिया खोडे यांचे समय महिला मंडळ, नगरसेविका डॉ. दीपाली कुलकर्णी यांचे प्रगती महिला मंडळ, रवींद्र गामणे यांचे मुरली फाउंडेशन, राम बडगुजर आणि माजी नगरसेवक संजय नवले आदी मंडळांतर्फे दर वर्षी दांडिया रासचे आयोजन करतात. 


अनेक वर्षांपासून दांडियाचे नियोजन करत आहोत. यंदा मात्र ते शक्य नाही. नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी दांडिया खेळविल्या जात होत्या. पुढील वर्षी यंदाची कसर नक्कीच भरून काढू. 
-पुष्पा आव्हाड, नगरसेविका 

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!

परिसरातील सर्वच दांडिया मैदाने सुरक्षित आणि प्रशस्त असतात. त्यामुळे सर्वच दांडियाचा मनसोक्त आनंद घेतात. खेळण्यांची दुकाने सजतात. त्यामुळे घरातील लहानग्यांना आनंद मिळतो. यंदा मात्र हा आनंद मिळणार नसल्याने चुकल्या चुकल्यासारखे वाटत आहे. 
-भारती जाधव, स्थानिक 

loading image