Nashik News : कचरा थेट रस्त्यावरील दुभाजकाच्या भागात; अपघातात वाढ!

Garbage dumped in the dividers on the road in Phulenagar area of ​​Peth Road.
Garbage dumped in the dividers on the road in Phulenagar area of ​​Peth Road.esakal

पंचवटी (जि. नाशिक) : पेठरोडला फुलेनगर परिसराच्या भागात निघालेला कचरा थेट रस्त्यावरील दुभाजकाच्या भागात टाकला जात आहे. या कचऱ्यावर गुजराण करणाऱ्या गायी, शेळ्या, कुत्री यांचा येथे वावर वाढत असल्याने रस्त्यावरून पायी ये -जा करणाऱ्यांसह वाहनचालकांनाही त्यांचा धोका निर्माण होत आहे. अशा प्रकारे कचरा टाकणाऱ्यांवर महापालिकेकडून कोणत्याच प्रकारची कारवाई होत नसल्याने हे प्रकार वाढत आहे. (Garbage directly in road bifurcation area Increase in accidents Nashik News)

शहर परिसरातील कचरा उचलण्यासाठी घंटागाड्यांची व्यवस्था असताना, या घंटागाड्या छोट्या गल्ली-बोळातही जात असतानाही त्यांच्यात कचरा टाकण्याऐवजी ते थेट रस्त्यावरील दुभाजकांच्या भागात टाकला जात आहे. त्यामुळे पेठरोडसारख्या मुख्य रस्त्यावर घाण तर साचतेच, त्या घाणीची सुटणारी दुर्गंधी असह्य करणारी ठरत आहे. येथून ये -जा करताना नाकावर रुमाल धरून जाण्याची वेळ येत आहे. कचऱ्यासोबत शेण-मूत्रही या परिसरात फेकण्याचे प्रकार घडत आहेत. एकीकडे सुंदर नाशिक स्वच्छ नाशिक अशी वल्गना केली जात असताना मुख्य रस्त्यावरच अशा प्रकारची कचऱ्याची घाण पडलेली दिसत आहे.

रस्त्यावर टाकलेल्या कचऱ्यातील भाजीपाल्याचा पाल्यासह उरलेले खाद्यपदार्थ यांचा समावेश असतो. ते खाण्यासाठी येथे गायी, शेळ्या, कुत्री, डुकरे अशी अनेक मोकाट जनावरे येतात. ते खाण्यासाठी त्यांच्या चुरस लागते. तेव्हा ती जनावरे एकमेकांच्या अंगावर धावून जातात. ते रस्त्यावर अचानक येत असल्यामुळे अनेकदा ते वाहनांवर धडकतात. तसेच पायी जाणाऱ्यांनाही धडका देतात. त्यामुळे अपघात होत आहे. त्यामुळे या रस्त्याने जाताना नागरिकांना प्रचंड दक्षता बाळगावी लागते.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Garbage dumped in the dividers on the road in Phulenagar area of ​​Peth Road.
Christmas Festival : नाशिक रोड परिसरात नाताळ उत्साहात

पेठरोडच्या पेठफाटा ते कालव्याचा पूल या दरम्यानच्या रस्त्यात फुलेनगरच्या परिसरात कचरा फेकण्याची स्थितीत दिसत आहे. कालव्याच्या पुलावर दोन्ही बाजूला अशा प्रकारे कचरा फेकला जात असल्याने तेथेही दुर्गंधीचा त्रास होत असतो. त्यापेक्षा जास्त त्रास रस्त्यावरील दुभाजकाच्या जागी फेकलेल्या कचऱ्यामुळे होत आहे.

दुभाजकावरच्या जाळ्यांवर घरातील अंथरूण-पांघरूणाची कपडे वाळत घातली जात असल्याचे चित्र नेहमीचेच झालेले आहे. या जाळ्या जणूकाही कपडे वाळविण्याची हक्काची जागाच आहे. अशा प्रकारे त्यांचा वापर केला जात आहे. या प्रकारांवर आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Garbage dumped in the dividers on the road in Phulenagar area of ​​Peth Road.
ZP, Panchayat Samiti Election : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीकडे लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com