घंटागाडी ठेकेदाराचा पराक्रम बघून आयुक्तही चक्रावले; पैसे उकळण्याचा धंदा उघड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

0ghanta_gadi_0.jpg

घंटागाडीत कचरा संकलित केल्यानंतर पाथर्डी येथील कचरा डेपोत तो संकलित केला जातो. त्यापूर्वी येथील वजनकाट्यावर घंटागाडीचे वजन केले जाते. वजनानुसार प्रतिटन पाचशे ते सहाशे रुपये घंटागाडी ठेकेदाराला अदा केले जातात. 

घंटागाडी ठेकेदाराचा पराक्रम बघून आयुक्तही चक्रावले; पैसे उकळण्याचा धंदा उघड

नाशिक : शहरातून घनकचरा संकलित केल्यानंतर खत प्रकल्पावर घंटागाडीचे वजन होते व त्यानुसार संबंधित ठेकेदारांना वजनानुसार महापालिकेकडून निधी अदा केला जातो. परंतु घंटागाडीत माती व दगड टाकून वजन वाढविण्याची शक्कल लढवून पैसे उकळण्याचा धंदा आयुक्तांनी केलेल्या पाहणीतून उघड झाला आहे. 

शक्कल लढवून पैसे उकळण्याचा धंदा

नाशिक रोड विभागातील मे. तनिष्क सर्व्हिसेस या कंत्राटदार कंपनीच्या दोन घंटागाड्यांमध्ये माती व दगड आढळून आल्याने आयुक्त कैलास जाधव यांनी दंडात्मक कारवाईचे आदेश दिले. शहरातील घराघरांमधून बाहेर पडणारा घनकचरा घंटागाडीद्वारे संकलित केला जातो. त्यासाठी पूर्व, पश्‍चिम, नाशिक रोड, पंचवटी, सिडको व सातपूर या सहा विभागांसाठी स्वतंत्र कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. घंटागाडीत कचरा संकलित केल्यानंतर पाथर्डी येथील कचरा डेपोत तो संकलित केला जातो. त्यापूर्वी येथील वजनकाट्यावर घंटागाडीचे वजन केले जाते. वजनानुसार प्रतिटन पाचशे ते सहाशे रुपये घंटागाडी ठेकेदाराला अदा केले जातात. 

हेही वाचा >  भाजप नेत्याच्या वाढदिवसाचा भररस्त्यात जल्लोष! पोलिस प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

दंडात्मक कारवाईचे आदेश 

वजनानुसार पैसे अदा केले जात असल्याने घंटागाडीतील कचऱ्याच्या ढिगाखाली माती व दगड टाकून वजन वाढविण्याचा प्रकार आयुक्तांच्या पाहणीत उघड झाला. काही दिवसांपूर्वी आयुक्त जाधव यांनी घंटागाडीचे वजन तपासले. अधिक वजन असल्याने कचऱ्याची तपासणी केली असता त्यात दगड, माती आढळून आल्याने तत्काळ दंडात्मक कारवाईचे आदेश संबंधित ठेकेदाराला देण्यात आले. 

हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

loading image
go to top