GIS Mapping : नाशिक गावठाणला डिजिटल होण्याचा पहिला मान! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

geographical indication system mappind

GIS Mapping : नाशिक गावठाणला डिजिटल होण्याचा पहिला मान!

नाशिक : नाशिक गावठाण ला डिजिटल (Digital) होण्याचा पहिला मान मिळाला आहे. जलवाहिन्या, पावसाळी गटार, भूमिगत विद्युत वाहिन्या, इंटरनेट केबल, मल वाहिन्या यांची अचूक माहिती आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर मिळणार आहे. (Gavthan has got the honor of being first to go digital by completing 100 percent GIS mapping nashik news)

स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने भौगोलिक माहिती प्रणाली अर्थात जीआयएस मॅपिंग पूर्ण झाले असून मार्च अखेर पर्यंत नागरी सोयी सुविधा एकाच व्यासपीठावर गावठाणातील नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

माहिती व तंत्रज्ञानाच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयाच्या वतीने मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने शहरातील गावठाण भागात डिजिटल प्लॅटफॉर्मवर माहिती संकलित करण्यासाठी सर्वेक्षण केले.

पंचवटी जुने नाशिक तसेच गंगापूर रोड परिसरात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले या सर्व सर्वेक्षणातून प्राप्त झालेल्या माहितीची नोंद अँप वर करण्यात आली. नाशिक शहराच्या नागरी सेवांच्या रचनाबद्ध डिजिटल नोंदी उपयुक्तता मोजणी व भविष्यातील नागरी सुविधांच्या नियोजनासाठी जीआयएस मॅप करण्यात आले.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

जीआयएस मॅपिंगच्या माध्यमातून प्राप्त होणारी माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर व डिजिटल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे संरक्षणाच्या माध्यमातून पालिकेच्या वतीने पूर्णत आलेल्या सुविधांची अचूक माहिती नोंदविण्यात आली आहे.

जीआयएस मॅपिंग हे जगभरातील विविध विकसित शहरात वापरले जाता या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वर्तमानातील सेवा सुविधांच्या जाळ्याची विस्तृत माहिती उपलब्ध होऊन भविष्यात नियोजन करणे सोपे होणार आहे त्याचप्रमाणे नागरिकांना देखील उद्भवणाऱ्या विविध समस्यांचे देखील निवारण करण्यास मदत होईल सुविधांच्या देखभाल दुरुस्ती व नूतनीकरणासाठी देखील या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे.

या कारणासाठी होईल उपयोग

स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून गावठाण भागातील मालमत्तेच्या मूळ मालकाचे नाव पत्ता दूरध्वनी क्रमांक मालमत्तेच्या संदर्भातील कागदपत्रे नळ जोडणे गटार इलेक्ट्रिसिटी जोडणे पावर बॅकअप पार्किंग फायर एक्सटेन्शन लिफ्ट रेन वॉटर हार्वेस्टिंग शोष खड्डा या संदर्भात माहिती विचारण्यात आली.

मालमत्तेचा सध्या सुरू असलेला वापर यासंदर्भातील उपरोक्त माहिती मोबाईल ॲप मध्ये नोंदणी करण्यात आली आहे घरांचे जिओ टॅगिंग फोटो घेण्यात आले आहे. गावठाणातील पावसाळी गटार योजना, जलवाहिन्या, भूमिगत विद्युत वाहिन्या, इंटरनेट केबल्स, मलवाहिका यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. मार्च अखेर पासून महापालिकेच्या संकेतस्थळावर व डिजिटल प्लॅटफॉर्मवर सविस्तर माहिती उपलब्ध होईल अशी माहिती स्मार्ट सिटी कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी दिली.