नाशिक : पंचवटी एक्स्प्रेसमध्ये जनरल तिकीट सुरू

railway
railwaysakal

नाशिक रोड : नाशिककरांची प्रवास वाहिनी असणारी पंचवटी एक्स्प्रेसमध्ये (Panchavati Express) अनारक्षित सुविधा (Unreserved facility), मासिक पास (Monthly pass) सेवा या गोष्टी सुरू करण्यात आल्या असून, यामुळे मनमाड ते मुंबई रेल्वे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

६ जनरल डबे

प्रवाशांनी यामुळे समाधान व्यक्त केले असून, रेल्वे प्रवासी संघटनेबरोबरच नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असल्याची प्रतिक्रिया रेल्वे सल्लागार समितीचे राजेश फोकणे यांनी व्यक्त केले आहे.
पंचवटीच्या सहा डब्यामध्ये जनरल तिकीट (General ticket) व मासिक पास सुविधा आता स्वीकारली जाणार आहे. यामुळे चाकरमानी सुखावला आहे. मासिक पास धारक आणि अनारक्षित प्रवाशांसाठी २५ डिसेंबरपासून सेवा सुरू होत आहेत. मात्र, प्रवास करताना रेल्वेने आरोग्याची खबरदारी घेतली आहे.

railway
राज ठाकरेंची 'ही' कृती पाहून तुम्हीही 'मनसे' म्हणाल; 'वाह क्या बात है!'

अशा असतील अटी -

प्रवाशांमध्ये केवळ केवळ पूर्ण लसीकरण (Vaccination) झालेले प्रवासी, राज्य सरकारचे वैध युनिव्हर्सल कार्डधारक (Universal card) आणि ज्यांचे वय १८ वर्षांखालील आहे तेच त्यांचे वय सिद्ध करणारे सरकारी ओळखपत्र घेऊन प्रवास करू शकतात. जी व्यक्ती मुक्कामासाठी पात्र आहे, परंतु कोणत्याही वैद्यकीय कारणास्तव लस घेऊ शकत नाही. ती त्याच्या वैद्यकीय प्रमाणपत्रासह प्रवास करू शकते. अनारक्षित तिकीट किंवा एकल प्रवासाचे एमएसटी धारक केवळ अनारक्षित म्हणून घोषित केलेल्या कोचमध्ये प्रवास करू शकतात. आरक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्यांना शिक्षा होईल. ही सुविधा सध्या फक्त १२१०९/१० पंचवटी एक्स्प्रेसमध्ये दिली जात आहे. त्यामुळे असे प्रवासी इतर कोणत्याही ट्रेनमध्ये प्रवास करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

''ही सुविधा सुरू केल्यामुळे अनेक नोकरदारांचे हाल थांबणार आहेत. अनेक वेळा पाठपुरावा केला. यश आल्याचे समाधान मिळत आहे. प्रवाशांनीही रेल्वेचे नियम पाळून प्रवास करावा.'' - राजेश फोकणे

railway
वाहतुकीचे नियम मोडल्यास थेट कोर्टात ; वाचा सविस्तर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com