हुडहुडी...! नाशिक पुन्हा गारठले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik cold

हुडहुडी...! नाशिक पुन्हा गारठले

नाशिक : गेल्‍या तीन-चार दिवसांपासून पारा वाढत असतांना, पुन्‍हा एकदा पाऱ्यात घसरण बघायला मिळाली. रविवारी (ता.१६) नाशिकचे किमान तापमान ११.४ अंश सेल्‍सीअस नोंदविले गेले आहे. तर कमाल तापमान २३.६ अंश सेल्‍सीअस राहिले. वातावरणात गारवा टिकून असल्‍याने नागरिकांकडून बचावात्‍मक उपाययोजनांवर भर दिला जातो आहे. (Getting cold in Nashik city)

संक्रांतीनंतर थंडी कमी होते का वाढते...?

नाशिकचा पारा सात अंशापर्यंत खालावल्‍यानंतर कमालीची थंडी अनुभवायला येत होती. मात्र गेल्‍या तीन-चार दिवसांपासून पारा पुन्‍हा वाढू लागला होता. व नाशिकचे किमान तापमान १२ अंश सेल्‍सीअसपेक्षा अधिक राहात होते. असे असतांना रविवारी पुन्‍हा पारा घसरल्‍याची नोंद झाली आहे. मकर संक्रांतीनंतर गारठा कमी होत जातो, असा सामान्‍य समज आहे. परंतु पुन्‍हा एकदा पारा घसरल्‍याने येत्‍या दिवसांत पुन्‍हा थंडी वाढते की गारठ्याचा जोर ओसरतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहाणार आहे. सध्यातरी थंडीपासून बचाव करण्यासाठी स्‍वेटर, जॅकेटसह अन्‍य विविध साधनांचा उपयोग केला जातो आहे. दरम्‍यान आता पुन्‍हा वातावरणात गारठा वाढल्‍यास आरोग्‍याचे प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता वर्तविली जाते आहे. त्‍यामुळे पुढील आठवडा हवामानाच्‍या बदलांच्‍या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.

हेही वाचा: नाशिक : 73 वर्षीय आजींवर 'टॅव्‍ही’ शस्‍त्रक्रिया यशस्‍वी

जळगावचे निच्चांकी तापमान

रविवारी जळगावचे किमान तापमान राज्‍यात निच्चांकी राहिल्‍याची नोंद आहे. जळगावचे किमान तापमान ११ अंश सेल्‍सीअस नोंदविले गेले आहे. महाबळेश्‍वरचे किमान तापमान ११.७ अंश सेल्‍सीअस राहिले. गोंदियाचेही तापमान ११ अंश सेल्‍सीअस असल्‍याची नोंद आहे.

हेही वाचा: कोरोना कायमस्वरूपी राहू शकत नाही - विषाणूशास्त्रज्ञ

Web Title: Getting Cold In Nashik City News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..