esakal | उद्धवा... दार उघड आता दार..! मंदिरे उघडण्याबाबत हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
sakal

बोलून बातमी शोधा

ghantanaad movement for temple reopen nashik marathi news

देशभरात २२ मार्चपासून लॉकडाऊन जाहिर करण्यात आले. तेव्हापासून देशभरातील धार्मिक स्थळे कुलुपबंदच आहेत. शासनाने टप्प्प्याने इतर आस्थापना सुरू करण्यास परवानगी दिलेली असलीतरी अद्यापही राज्यभरात ‘देऊळबंदी’ कायमच आहे...

उद्धवा... दार उघड आता दार..! मंदिरे उघडण्याबाबत हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

sakal_logo
By
दत्ता जाधव

नाशिक/पंचवटी : राज्यातील धार्मिक स्थळांचे कुलुप त्वरीत उघडून भाविकांना देवदर्शन व्हावे, यासाठी हिंदुत्ववादी संघटनांसह राज्यभरातील विविध देवस्थानांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. संघटनांच्या आज झालेल्या बैठकीत येत्या शनिवारी (ता.२९) सकाळी अकरा वाजता राज्यभरातील मंदिरांसमोर घंटानाद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

देशभरात २२ मार्चपासून लॉकडाऊन जाहिर करण्यात आले. तेव्हापासून देशभरातील धार्मिक स्थळे कुलुपबंदच आहेत. शासनाने टप्प्प्याने इतर आस्थापना सुरू करण्यास परवानगी दिलेली असलीतरी अद्यापही राज्यभरात ‘देऊळबंदी’ कायमच आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज राज्यातील देवस्थान विश्‍वस्ताच्या ऑनलाईन बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला शिर्डीचा साईबाबा, पंढरपूर देवस्थान, मुंबईचा सिद्धीविनायक आदी देवस्थानचे विश्‍वस्तांसह नाशिकच्या गंगा गोदावरी पुरोहित संघ सहभागी झाले होते. बैठकीत उद्धवा... दार उघड आता दार उघड...चा पुकारा करण्यात आला. 

हेही वाचा > भरचौकात 'त्याने' थेट वाहतूक पोलिसाच्याच श्रीमुखात भडकावली...नेमके काय घडले?

 
नाशकातही होणार घंटानाद 

नाशिक हे राज्यातील महत्वाचे धार्मिकस्थळ आहे. रामकुंड, श्रीकाळाराम मंदिर, कपालेश्‍वर, सीतागुंफा, तपोवन यामुळे पंचवटीत भाविकांची बारमाही गर्दी असते. मात्र कोरोनामुळे आलेल्या पाच महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे सर्वच मंदिरे बंद असल्याने शहरासह पंचवटीचे अर्थकारणच थांबल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या शनिवारी पंचवटीसह शहरातील प्रमुख मंदिरांसमोर घंटानाद करण्यात येणार असल्याची माहिती गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी दिली. 

हेही वाचा > पहाटेची वेळ...मंदिरात आश्रयाला थांबलेले गुराखी दुर्गंधीने अस्वस्थ; शोध घेताच बसला धक्का

संपादन - रोहित कणसे


 

loading image
go to top