Nashik Crime: खेडभैरव येथे घोटी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; 40 जणांवर गुन्हा दाखल

Crime
Crimeesakal

घोटी : खेड ( ता. इगतपुरी ) येथे घोटी पोलसांनी जुगारीवर छापा टाकत तब्बल चाळीस जणांवर गुन्हा दाखल करत ११ दुचाकी वाहांनासह रोख रक्कम ५१ हजार तीनशे रुपये व१९ मोबाईल जप्त करण्यात आले.

यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अट्टल जुगारी यांचे धाबे दनाणले आहे. (Ghoti Police raid gambling den at Khedbhairav case registered against 40 people Nashik Crime)

गोपनीय माहिती द्वारे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी पोलिसांचे पथक तयार करून खेड येथील मंदिराजवळ जुगारींना सुगाव लागू न देता रात्री ८.४५ दरम्यान छापा टाकला.

विशेष म्हणजे यामध्ये आजुबाजू परिसरासह अनेक ठिकाणाहून आलेल्या जुगारींना पकडण्यात यश आले. खेड,काणनवाडी, कावनई,इंदोरे,कोल्हार ता. राहुरी,वासाळी येथील जुगारीना पकडण्यात आले.

छाप्याची माहिती परिसरात पसरताच काही लोकप्रतिनिधींनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न देखील पोलिसांनी हाणून पडला.

Crime
Kolhapur Crime : दहा गुंठे जमिनीसाठी चुलत भावाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

या छाप्यात ४० जुगारीसह ११ दुचाकी वहाने,१९ मोबाईल व रोख रक्कम ५१ हजार तीनशे रुपये असा एकूण सात लाख २ हजार तीनशे रुपयांचा मुदेमाल या यावेळी मिळाला.

या छाप्या दरम्यान पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सहायक पोलीस निरीक्षक संदेश पवार, उपनिरीक्षक सुदर्शन आवारी,अनिल धुमसे,पोलीस नाईक श्रीकांत दोंदे, केशव बसते, गौरव सोनावणे,सतीश चव्हाण उपस्थित होते.

Crime
Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये २५० कोटींचे अमली पदार्थ जप्त

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com