Rakshabandhan 2023: रक्षाबंधनानिमित्त टपाल विभागास लाखांची भेट! विशेष पाकिटातून 2 लाखाचे उत्पन्न

indian post
indian postindian post

Rakshabandhan 2023 : भाऊ बहिणीच्या नात्याने टपाल विभागास पंधरा दिवसात लाखांचे उत्पन्न देऊन अनोखी भेट दिली आहे. (Gift of Lakhs to Postal Department on Rakshabandhan 2 lakh income from special wallet nashik)

नोकरी, शिक्षण विविध कारणांमुळे अनेक भावांना देशांतर्गत दूरवर तसेच विदेशात वास्तव्य करावे लागते. परदेशात राहत असल्याने रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींना भाऊरायास राखी बांधणे शक्य होत नाही.

तर भाऊरायांना बहिणीस भेट द्यायची झाल्यास त्यांनाही ते शक्य होत नाही. अशा वेळेस टपाल विभाग त्यांच्यासाठी मोठे माध्यम ठरत असते.

टपाल विभागाच्या पार्सल, स्पीड पोस्ट आणि रजिस्टर पोस्ट सेवेच्या माध्यमातून बहीण भावास राखी पाठवत असते. भाऊ बहिणीस भेटवस्तू देत दोघे एकमेकांचे प्रेम व्यक्त करत असतात.

दरवर्षी प्रमाणे यंदाही टपाल विभागाच्या विविध सेवेच्या माध्यमातून रक्षाबंधन निमित्ताने टपाल विभागाच्या विविध कार्यालयांना लाखोचे उत्पन्न मिळाले आहे. केवळ जीपीओ टपाल कार्यालयाचा विचार केला तर सुमारे दहा लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.

तसेच विशेष पाकिट विक्रीतून सुमारे ४५ हजारांचे उत्पन्न मिळाले. यादरम्यान देश विदेशात राखी आणि भेट वस्तूचे पार्सल स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्ट आणि विशेष पार्सल सेवा माध्यमातून भाऊ बहिणीपर्यंत पोहच झाले, अशी माहिती टपाल विभागाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. संदेश बैरागी यांनी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

indian post
Onion Subsidy: कांदा अनुदानाचा पहिला हप्ता खात्यात वर्ग होण्यास सुरवात

विशेष पाकिटातून दोन लाखांचे उत्पन्न

राखी पाठविण्यासाठी टपाल विभागाकडून राखी छापील विशेष पाकीट विक्रीस उपलब्ध करून देण्यात आले होते. महिलांचा खरेदीस उत्तम प्रतिसाद मिळाला.

जीपीओ टपाल कार्यालयात सुमारे साडेचार हजार पाकीट विक्री झाले त्यातून ४५ हजारांचे उत्पन्न मिळाले. तर अन्य ५५ टपाल कार्यालयातून १५ हजार ५०० पाकिटाची विक्री होऊन १ लाख ५५ हजार असे ५६ टपाल कार्यालयातून सुमारे २० हजार पाकिटांची विक्री होऊन २ लाखाच्या महसूलाची टपाल विभागाच्या तिजोरीत भर पडली.

अशी आहे पार्सलची संख्या

स्पीड पोस्ट ३ हजार ५१६

रजिस्टर पोस्ट ८ हजार ७१६

पार्सल ७१०

विदेशात

स्पीड पोस्ट १५८

रजिस्टर पोस्ट ११०

indian post
Nashik News: श्री कपालेश्‍वर शिवलिंगावर लवकरच वज्रलेप! पालखी सोहळ्याचेही वेळापत्रक निश्‍चित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com